मनोज गोरे।आॅनलाईन लोकमतकोरपना : कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात पाण्याची टंचाई, औषधांचा तुटवडा, रिक्त पदे, स्वच्छता यासारख्या मुलभूत समस्याचे ग्रहण लागले असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले. याकडे लोकप्रतिनिधी व आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने येथील ग्रामीण रुग्णालय समस्याचे माहेरघर बनले आहे.येथील ग्रामीण रुग्णालयात पाण्याची सर्वात मोठी समस्या आहे. बोअरवेल व विहिरीला पाणी नाही. केवळ १५ ते २० दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने येत्या दिवसात पाण्यासाठी रुग्णाची गैरसोय होणार आहे. परंतु पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास आरोग्य विभाग असमर्थ ठरला आहे.सन २०१२ मध्ये ग्रामीण रुग्णालयाला एक्सरे मशीन देण्यात आली. परंतु तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने सदर एक्स-रे मशीन धूळखात पडली आहे. त्यामुळे रुग्णाला एक्स-रे काढण्याकरिता चंद्रपूरला जावे लागते. त्याचबरोबर औषधांचा साठासुद्धा अपुरा असल्याचे दिसून आले. मागील कित्येक दिवसांपासून रुग्णालयात शुगर स्टिप नाही. त्यामुळे शुगरच्या रुग्णावर योग्य पद्धतीने उपचार होत नाही. रुग्णालयात स्वच्छतेकडे दुर्लक्ष दिसत असून संपुर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचे लोकमतच्या पाहणीत दिसून आले.ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त असून त्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक-१, वैद्यकीय अधिकारी १, स्टॉप नर्स २, सहायक अधिकारी १, लिपिक १, शिपाई १ या पदांचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चालविताना अडचण निर्माण होत आहे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सिफर नसल्याने येथील चौकीदारांकडून सिफरचे काम करावे लागते. परंतु येथे अजूनपर्यंत सिफर देण्यात आले नाही.ग्रामीण रुग्णालयात दारूच्या बाटलांचा खचकोरपना ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी निवासस्थानाकडे रिकाम्या दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. परिसर अस्वच्छ आहे. झाडेझुडपे असल्याने अंधारात साप, विंचु असल्याची भीती आहे.रुग्णालयात पाण्याची मोठी समस्या असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा. जेणेकरून उन्हाळ्यात रुग्णाची गैरसोय होणार नाही. याकरिता रुग्णालयाकडून अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णालयाचा कारभार सांभाळत असताना अडचण निर्माण होत असतात.- आर. व्ही. गायकवाड,वैद्यकीय अधिकारी.ग्रामीण रुग्णालयात उपचार मोफत मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात गोरगरीब रुग्ण रुग्णालयात येतात. परंतु येथे अपुरा कर्मचारी वर्ग नसल्याने योग्य उपचार होत नाही. रुग्णाला नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात जावे लागते. अनेक सोईसुविधा रुग्णाला मिळत नसल्याने येथील येणाºया रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णालयाला रुग्णावर उपचार करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री देण्यात यावी.- कल्पना पेचे, जि.प. सदस्य, चंद्रपूर
रिक्त पदे, अशुद्ध पाणी आणि औषधांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:23 IST
कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात पाण्याची टंचाई, औषधांचा तुटवडा, रिक्त पदे, स्वच्छता यासारख्या मुलभूत समस्याचे ग्रहण लागले असून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले.
रिक्त पदे, अशुद्ध पाणी आणि औषधांचा तुटवडा
ठळक मुद्देकोरपना ग्रामीण रुग्णालय समस्येचे माहेरघर : यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णांना करतात चंद्रपूरला रेफर