शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा विधानसभेचा धक्कादायक निकाल

By admin | Updated: October 19, 2014 23:52 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील निकाल धक्कादायक लागला. काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांचा २ हजार २७८ मतांनी पराभव करुन भाजपाचे अ‍ॅड. संजय धोटे विजयी झाले.

राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील निकाल धक्कादायक लागला. काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांचा २ हजार २७८ मतांनी पराभव करुन भाजपाचे अ‍ॅड. संजय धोटे विजयी झाले.सुभाष धोटे यांना ६३ हजार ८४५ मते मिळाली तर भाजपाचे अ‍ॅड. संजय धोटे यांना ६६ हजार २२३ मते मिळाली.सुधाकर किनाके १ हजार ६०१, उद्धव नारनवरे १ हजार २५१, प्रवीण निमगडे ५०५, शोभा मस्की ६७०, अरुण वासलवार १ हजार २१४, विद्यासागर कासर्लावार ७९८, सटवा थोरात ८३७, प्रेमदास मेश्राम एक हजार ११३, मदन बोरकर १ हजार ५६७ मते घेतली, १ हजार ३२४ मतदारांना १६ पैकी एकही उमेदवार पसंत आला नाही. संजय धोटेंची रॅलीभारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर राजुरा शहरात भव्य विजयी रॅली काढण्यात आली, शिवाजी महाविद्यालय स्टेडियमपासून निघालेली रॅली राजुरा शहरातील मुख्य रस्त्याने नाचत गाजत काढण्यात आली. या विजयी रॅलीमध्ये वाहनावर भाजपाचे नवनिर्वाचित आ. संजय धोटे यांच्या सोबत भाजपाचे राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, भाजपा अरुण मस्की, बादल बेले, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, सिद्धार्थ पथाडे, विनायक देशमुख, सतिश धोटे, मंगेश श्रीराम, मधुकर नरड, सोमेश्वर आईटलावार यासह राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.गांधी चौक येथे झालेल्या विजयी सभेत नवनिर्वाचीत आ. अ‍ॅड. संजय धोटे म्हणाले, राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी माझ्यावर, भाजपा पक्षावर विश्वास ठेऊन मला निवडणूक दिले. मी या क्षेत्रातील नागरिकांना हक्क मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करीन.मतदारांचे आभार- सुभाष धोटेराजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी मला भरपूर मतदान केले. थोड्या फरकाने पराजय झाला असला तरी मी या मतदान क्षेत्राच्या समस्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर राहील. सक्रिय राहणार- सुदर्शन निमकरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी या क्षेत्रातील मतदारानी सहकार्य केले त्यासह सर्व नागरीकाच्या समस्या सोडविण्यासाठी मी तत्पर राहून कार्य करणार आहे.