शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

बंद रुग्णवाहिकेमुळे सावलीत रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

आरोग्याच्या हितासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत असले, तरी सावली येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका मागील काही दिवसांपासून बंद असल्याने रूग्णांना दुसरीकडे हलविताना कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय असल्याने परिसरातील बहुतांश रुग्ण उपचाराकरिता येतात. त्यांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली होती.

ठळक मुद्देआरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष : रुग्णांना आर्थिक भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : सावली हे तालुक्याचे मुख्यालय असून या ठिकाणी एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. परिसरातील नागरिकांना आरोग्याची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. आरोग्याच्या हितासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत असले, तरी सावली येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका मागील काही दिवसांपासून बंद असल्याने रूग्णांना दुसरीकडे हलविताना कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय असल्याने परिसरातील बहुतांश रुग्ण उपचाराकरिता येतात. त्यांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली होती.दीड वर्षांपूर्वी वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयातील जुनी रुग्णवाहिका या रुग्णालयाला देण्यात आली. रुग्णवाहिका उपलब्ध झाली तेव्हापासून अनेकदा बिघाड आला आणि दुरुस्तीकरिता पंधरा-पंधरा दिवसाचा कालावधी लागत आहे. दरम्यान, अतिगंभीर रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करताना रुग्णवाहिकेसाठी भटकावे लागत असल्याचे वास्तव आहे. रुग्णाला तात्काळ सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका ही अत्यावश्यक बाब असली तरी या रुग्णालयातील रुग्णवाहिका नेहमीच नादुरुस्त राहत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नाईलाजाने खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे.रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. लवकर दुरुस्त करून देण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. दोन-तीन दिवसात या रूग्णालयाला रुग्णवाहिका उपलब्ध होईल.- डॉ.यमु मडावी,वैद्यकीय अधीक्षकग्रामीण रुग्णालय. सावली.आरोग्य सेवा ही अतिआवश्यक सेवा आहे. रुग्णवाहिका नादुरुस्त असणे ही गंभीर बाब असून परिसरातील नागरिकांना तात्काळ आरोग्यसेवा मिळण्याकरिता या रुग्णालयात अद्यावत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी.- विजय कोरेवार, सभापती पंचायत समिती सावलीसावलीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता आहे. आरोग्य प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. येत्या आठ दिवसात नवीन रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.- रोशन बोरकर, शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, सावली

टॅग्स :hospitalहॉस्पिटल