२४ तासांत सात कोरोना रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST2021-02-10T04:28:38+5:302021-02-10T04:28:38+5:30

सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २३ हजार १५३ झाली. त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ६६९ झाली आहे. ...

Seven corona patients were found within 24 hours | २४ तासांत सात कोरोना रुग्ण आढळले

२४ तासांत सात कोरोना रुग्ण आढळले

सुरुवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या २३ हजार १५३ झाली. त्यापैकी बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ६६९ झाली आहे. सध्या ९२ बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत २ लाख ४ हजार १८० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ७९ हजार ९१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५३, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १५, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या सात रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील तीन, राजुरा दोन व वरोरा येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेला नाही, कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे, तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Seven corona patients were found within 24 hours