शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हवी एकरी ३० हजारांची मदत

By admin | Updated: March 6, 2015 01:16 IST

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे या पावसाने कंबरडे मोडले आहे.

चंद्रपूर : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे या पावसाने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून एकरी ३० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी केली आहे.यंदाच्या हंगामात सुरुवातीला उशिरा हजेरी लावल्याने आणि ऐन पीक कापण्याच्या वेळेस झालेल्या अति पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अल्पसे उत्पादन आले आहे. त्यातही शासनाकडून योग्य भाव दिला जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या संकटावर मात करीत रब्बी पीक चांगले येईल, या आशेत बळीराजा होता. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे चना, गहू, ज्वारी, फळबाग या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील नुकसानीचे सर्वच काम सुरू केले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३० हजार रुपये आर्थिक मदत आणि जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुरेश रामगुंडे यांच्यासह डी.के. आरीकर, संजय पिंंपळकर, रवी शर्मा आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)