नवरगावातील ती शाळा होत आहे पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:31 IST2021-08-20T04:31:56+5:302021-08-20T04:31:56+5:30

सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील मागील अनेक वर्षांपासून शिक्षण विभागातील तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी व स्थानिक शिक्षण संस्थांसम्राट ...

The school in Navargaon is being reopened | नवरगावातील ती शाळा होत आहे पुन्हा सुरू

नवरगावातील ती शाळा होत आहे पुन्हा सुरू

सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील मागील अनेक वर्षांपासून शिक्षण विभागातील तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी व स्थानिक शिक्षण संस्थांसम्राट यांच्या मिलीभगतमुळे बंद करण्यात आलेली होती. ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुन्हा सुरु व्हावी म्हणून विद्यार्थीहित लक्षात घेऊन बहुजन विद्यार्थी फेडरेशनने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत ही शाळा अखेर पुन्हा नव्याने सुरू होणार असल्यामुळे नवरगावातील पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

या शाळेचे दुसरीकडे स्थलांतर होणार आहे. परिणामी गावातील गोर-गरीब पालकांच्या मुलांना हक्काच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. बहुजन विद्यार्थी फेडरेशनने यापूर्वीही शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी प्रवेश प्रश्न, शासकीय आयटीआय सिंदेवाहीतील विद्यार्थीसाठी विनंती बसथांबा, तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन अशी अनेक कामे केलेली आहेत.

Web Title: The school in Navargaon is being reopened