शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 00:51 IST

वेकोलि महिला कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

सव्वा लाखाची सुपारी : वेकोलि महिला कर्मचारी खूनप्रकरणमाजरी : वेकोलि महिला कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. त्या महिलेच्या सुनेने आपल्या प्रियकराला सासूच्या खुनाची १ लाख ३० हजार रुपयाची सुपारी दिली. तसेच पोलिसांना या हत्येमध्ये मुलगाही सहभागी असल्याचे तपासात आढळून आले आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.वेकोलिच्या माजरी क्षेत्राच्या खुल्या कोळसा खाण कार्यालयात काम करणाऱ्या बातुनीबी अमिर अली शेख यांच्या सेवानिवृत्तीला अवघे १८ दिवस शिल्लक होते. कोल इंडियामध्ये काम करीत असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील मुलगा वा मुलीला नोकरी मिळत असते. त्याचाच लोभ करून सून माजदा खातुन अनिस अमिर अली शेख (२९) व मुलगा अनिस अमिर अली शेख यांनी कट रचला. माजदा खातुन हिने आपल्या प्रियकराला १ लाख ३० हजारांची सुपारी देऊन सासूचा खून करण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी तीन-चार दिवसांपासून सदर महिलेचा पाठलाग करीत होते. जेवनाची सुटीमध्ये १२ नोव्हेंबरला दुपारी वेकोलि कार्यालयातून ती एकटी येत असताना माईन नंबर तीनच्यावेकोलि रेल्वे व्हॅगन काटा घरामागे तिच्या डोक्यावर वजनी शस्त्राने चार-पाच वार करण्यात आले. त्यामध्ये ती जागीच ठार झाली.मारणारे आरोपी रामा राजू प्रजापती (२८), रा. मटन मार्केट, माजरी व दुसरा मुमताज शहाबुद्दीन सिद्दिकी (३०), रा. दफाई नंबर एक, माजरी हे असून दोन्ही आरोपीला पोलिसांनी विस्लोनजवळ अटक केली आहे. परंतू माजरी पोलिसांनी या दोघांना अद्याप अटक म्हणून दाखविलेले नाही. मुलगा व सूनेला अटक करून शुक्रवारी भद्रावती कोर्टात हजर केले.भद्रावती न्यायालयाने दोन्ही आरोपींना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार के.आर. तिवारी करीत आहेत. (वार्ताहर)खुन्यांना तत्काळ अटक करून शिक्षा द्यामुलगा नोकरी व संपत्तीच्या लोभापोटी रक्ताचे नाते विसरला. सून व मुलाने आपल्या आई बातुनीबी अमीर अली शेख हिची हत्या केली. या हत्येनंतर मृतक महिलाची मुलगी अनिसाबानो अस्लम शेख ने ‘लोकमत’ला सांगितले की, ही हत्या माझी वहिनी माजदा शेख अनिस अमीर अली शेख, भाऊ अनिस अमीर अली शेख, माझ्या भावाचा सासरा, साला व माझ्या वहिनीचा प्रियकर या सर्वांनी मिळुन कट रचला व तिची हत्या केली. पोलीस फक्त चौघांनाच या गुन्ह्यात आरोपी बनवले असुन इतर लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या आईच्या हत्येस ज्या-ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांना ताबडतोब अटक करून त्यांना कडक शिक्षा द्या अशी मागणी मृतक महिलेची मुलगी अनिसाबानो अस्लम शेख हिने केली आहे.