सचिन तेंडुलकरची आठवी ताडोबा सफारी ! 'जुनाबाई' वाघिणीच्या परिवाराचे पुन्हा झाले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:26 IST2026-03-28T14:25:37+5:302026-03-28T14:26:25+5:30

Chandrapur : क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर गुरुवारी (दि. २६) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले. त्यांनी आठवी ताडोबाची सफारी केली.

Sachin Tendulkar's eighth Tadoba safari! 'Junabai' tigress's family reunited | सचिन तेंडुलकरची आठवी ताडोबा सफारी ! 'जुनाबाई' वाघिणीच्या परिवाराचे पुन्हा झाले दर्शन

Sachin Tendulkar's eighth Tadoba safari! 'Junabai' tigress's family reunited

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर (चंद्रपूर):
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर गुरुवारी (दि. २६) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दाखल झाले. त्यांनी आठवी ताडोबाची सफारी केली. यापूर्वी २२ नोव्हेंबरला पत्नी अंजली व मित्रांसह सातवी सफारी केली होती. चिमूर तालुक्यातील एका खासगी रिसॉर्टमध्ये मित्र आणि परिवारासह ते यावेळी आले आहे.

शुक्रवारी (दि. २७) सकाळी त्यांना मदनापूर बफर गेटमधून प्रसिद्ध जुनाबाई वाघिणीचे दर्शन झाले, ती आपल्या चार बछड्यांसह होती. विशेष म्हणजे, काही वर्षांपूर्वी जुनाबाई प्रथमच त्यांना दिसली होती आणि त्या वेळेस तिच्यासोबत चार बछडे होते. यावेळीही त्या दृश्याची पुनरावृत्ती पाहून सचिन यांचा आनंद झाला. जुनाबाई वाघिणीच्या कुटुंबाबद्दल सचिन यांना विशेष आकर्षण आहे. प्रत्येक भेटीत तिचे दर्शन होणे त्यांच्यासाठी खास क्षण ठरत आहे. सचिनच्या या भेटीतून ताडोबातील वन्यजिवांबद्दल असलेले प्रेम स्पष्टपणे दिसून येते. 

Web Title : सचिन तेंदुलकर की ताडोबा सफारी: जुनाबाई बाघिन और शावक फिर दिखे!

Web Summary : सचिन तेंदुलकर ने अपनी आठवीं ताडोबा सफारी का आनंद लिया, जहाँ उन्होंने मदनपुर गेट के पास जुनाबाई बाघिन को अपने चार शावकों के साथ देखा। उन्होंने पहले भी उसे शावकों के साथ देखा था। तेंदुलकर का ताडोबा के वन्यजीवों के प्रति आकर्षण स्पष्ट है।

Web Title : Sachin Tendulkar's Tadoba Safari: Spotted Tigress Junabai and Cubs Again!

Web Summary : Sachin Tendulkar enjoyed his eighth Tadoba safari, spotting the Junabai tigress with her four cubs near Madanapur gate. He previously saw her with cubs. Tendulkar's fascination with Tadoba's wildlife is evident.