शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

१५ रुपयांच्या पाण्यासाठी आरपीएफने झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 15:28 IST

पाण्याची बाटली दिली नाही म्हणून पेन्ट्री कारच्या मॅनेजरवर आरपीएफ शिपायाने गोळी झाडली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या काजीपेठ ते खम्मम यादरम्यान घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिल्लीकडून चेन्नईकडे जाणाऱ्या जीटी एक्सप्रेस क्रमांक १२६१६ या रेल्वे गाडीमधे केवळ १५ रुपयांची पाण्याच्या बॉटल दिली नाही म्हणून पेन्ट्री कारच्या मॅनेजरवर आरपीएफ शिपायाने गोळी झाडली. ही घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या काजीपेठ ते खम्मम यादरम्यान घडली.दिल्लीहून येणारी जीटी एक्स्प्रेस बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ४ वाजता रवाना झाली. पुढे रात्री ९. ३० वाजता काजीपेठ ते खम्ममच्या दरम्यान गाडीत गस्तीवर असलेला रेल्वे सुरक्षा दलाचा सिपाही पी. अशोककुमार (बॅच नंबर ४१५७) हा पेन्ट्री कारमध्ये जाऊन मॅनेजर सुनील तोमर रा.भिंड, मध्यप्रदेश यांना पैसे न देता पाण्याची बॉटल मागू लागला. त्याने न दिल्यामुळे वाद निर्माण झाला. त्यानंतर आरपीएफ पी. अशोककुमार याने रागाच्या भरात सुनीलवर गोळी झाडली. ती सुनील यांच्या छातीत घुसल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटना लगेच खम्मम रेल्वे पोलीस व आयआरसीटीसी विभागाला ट्विटरवर दिली व खम्मम रेल्वेस्थानक येताच गोळी मारणाऱ्या पी. अशोककुमार यांना अटक करण्यात आली. तसेच जखमी सुनील तोमर यांना खम्ममच्या इस्पितळात भरती करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी