Roof of primary school in Chandrapur district collapsed; Student safe | चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेचे छत कोसळले; विद्यार्थी सुरक्षित

चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेचे छत कोसळले; विद्यार्थी सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: भद्रावती तालुक्यात असलेल्या आष्टी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे छत १४ जानेवारी रोजी अचानक कोसळले. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक प्रार्थनेसाठी पटांगणात उभे असल्याने कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही वा कुणी जखमी झाले नाही.
या शाळेची वास्तू ही जवळपास ३५ वर्षे जुनी असल्याचे सांगितले जाते. सकाळच्या वेळेस विद्यार्थी प्रार्थना करत असताना शाळेचे सिमेंटचे छत अचानक कोसळले. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात व विद्यार्थी संख्या ७० च्या घरात आहे. या घटनेने जि.प.शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता मात्र पुन्हा ऐरणीवर आली आहे.

Web Title: Roof of primary school in Chandrapur district collapsed; Student safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.