शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

पाचगाव येथील नऊ घरांचे छत उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:01 IST

दोन दिवसापूर्वी विजेच्या गडगडाटासह अचानक वादळ- वाऱ्याने हजेरी लावली. यात हिरामण जीवतोडे यांच्या घराचे छत वादळाने अक्षरश: शेतात नेऊन फेकले. वादळ आले तेव्हा घरी सर्वजण एकत्र बसले होते. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राजू भोयर यांच्या घराचेही नुकसान झाले. पाचगाव येथील संदीप आगरकर, बंडू कुरटकर, अरुण चिडे, किसन पाल, सुधाकर गेडेकर, पंढरी गौरकर, चेतन विरंदडे याच्या घरांची व गोठ्यांची पडझळ झाली.

ठळक मुद्देवादळी पावसाचा फटका : शेतपिकांचेही मोठे नुकसान, शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : राजुरा तालुक्यातील पाचगाव येथे आलेल्या वादळामध्ये गावातील ९ घरांचे छत उडाले. दरम्यान, अवकाळी पावसाने परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.दोन दिवसापूर्वी विजेच्या गडगडाटासह अचानक वादळ- वाऱ्याने हजेरी लावली. यात हिरामण जीवतोडे यांच्या घराचे छत वादळाने अक्षरश: शेतात नेऊन फेकले. वादळ आले तेव्हा घरी सर्वजण एकत्र बसले होते. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राजू भोयर यांच्या घराचेही नुकसान झाले. पाचगाव येथील संदीप आगरकर, बंडू कुरटकर, अरुण चिडे, किसन पाल, सुधाकर गेडेकर, पंढरी गौरकर, चेतन विरंदडे याच्या घरांची व गोठ्यांची पडझळ झाली.गावातील विजतारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळात वीज डीपी कोसळल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले. शेतातील गहू, हरभरा, ज्वारी काढणीवर असताना तोंडात आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. शेतात पिकांची कापणी करून ठेवलेले तेही ओले झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पाचगावसह परिसरातील अहेरी, खामोना, वरूड, भेदोडा येथील शेतीची दाणादाण झाली असून शेतकरी चिंतेत पडले आहे.

टॅग्स :Rainपाऊस