तेलगणाला जोडणारे मार्ग रखडलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST2020-12-13T04:41:12+5:302020-12-13T04:41:12+5:30

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करा कोरपना : तालुक्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुंची गैरसोय होत आहे. त्यामुळे याठिकाणी ...

The road connecting Telangana is blocked | तेलगणाला जोडणारे मार्ग रखडलेलेच

तेलगणाला जोडणारे मार्ग रखडलेलेच

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करा

कोरपना : तालुक्यातील अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुंची गैरसोय होत आहे. त्यामुळे याठिकाणी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तालुक्यातील कोरपना, वडगाव येथे तातडीने अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

शिवधुरा मोकळा करण्याची मागणी

राजुरा : तालुक्यातील चनाखा सांतरी शिवधुरावरुण वहिवाट आहे. मात्र तरीसुद्धा देवीदास मून, रमेश लोखंडे, राघोबा मून, नानाजी मोरे, नत्थू बोबडे यांचा मार्ग रोखुन नाहक त्रास देण्यात येत आहे. राजुरा तालुक्यातील सतरी येथील काही शेतकरी विद्युत शॉक लावून मार्गावर खड्डे करुण शेतामधील समान नेण्यास अडथडा निर्माण करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देवीदास मून यांनी केली आहे.

जनता महाविद्यालयात उद्बोधन वर्ग

चंद्रपूर : चांदा शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित जनता महािवद्यालय चंद्रपूर येथे संस्थेचे सचिव डॉ. प्राचार्य अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात एम.एसी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन आभासी उद्बोधन कार्यक्रम पार पडला. यावेळी आयक्यूएसीची भूमिका व नॅक बाबत आयक्यूएसी समन्वयक डॉ. एम. आर. बेग यांनी माहिती दिली. त्यांना चित्रफितद्वारे पाच वर्षाच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. के. सी. पाटील संचालन डॉ. मनिषा महातळे तर आभार डॉ. एस. डी. मिसार यांनी मानले.

Web Title: The road connecting Telangana is blocked