शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

अंधारी नदीचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:53 IST

अंधारी नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्यांमध्येच कोरडे पडले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पुरक अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने महिलांमध्ये स्थानिक प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता : उपाययोजना करणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : अंधारी नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्यांमध्येच कोरडे पडले आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता पुरक अशी कुठलीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नसल्याने महिलांमध्ये स्थानिक प्रशासनाविरोधात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द या गावाला ग्रामीण पाणी पुरवठा योजने अंतर्गत अंधारी नदीचे पात्रातून नळाद्वारे पाणी दिले जाते. गावात व जवळच्या परिसरात पाण्याचे स्त्रोत फार खोलवर असल्याने मार्च-एप्रिल महिन्यातच हॅन्डपंप व विहिरी कोरड्या पडत असतात. दरवर्षी अंधारी नदीचे पाणी एप्रिल-मे महिन्यापर्यंत पुरत होते. परंतु, यावर्षी अंधारी नदी फेब्रुवारी महिन्यातच कोरडी पडली असल्याने देवाडा खुर्द वासियांना नळाद्वारे पाणी मिळणे दुरापास्त होणार चिन्हे दिसून येत असून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.दरवषी येथील नागरिक शेतशिवारातील विहिर व तलावाचे पाणी बैलबंडीद्वारे किंवा दोर- बादलीच्या सहय्याने खोलवर विहिरीचे पाणी काढून तहाण भागवावी लागते. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरीवर पाण्यासाठी गर्दी होत असते. अनेक महिला तर रात्रीच्या वेळी झोपमोळ करुन पाणी भरत असतात. याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती होत असूनही कुठलीच पर्यायी व्यवस्था होत नसल्याने नागरिकांत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्यान लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.पाण्यासाठी बंधाऱ्याचा वापरदेवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत अंधारी नदीच्या पात्रात सिमेंट पिशवीद्वारे बंधारा बांधण्यात आला असून या बंधाऱ्यातील पाणी नळाद्वारे देण्यात येत आहे. हे पाणी काही दिवसातच संपणार असल्याचे बोलले जात आहे.