यंग चांदा ब्रिगेडतपे दिव्यांगांसाठी स्नेहमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST2020-12-06T04:30:27+5:302020-12-06T04:30:27+5:30

चंद्रपूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ...

Reunion for the Young Chanda Brigade | यंग चांदा ब्रिगेडतपे दिव्यांगांसाठी स्नेहमिलन

यंग चांदा ब्रिगेडतपे दिव्यांगांसाठी स्नेहमिलन

चंद्रपूर : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, निलेश पाझारे, यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, मुन्ना खोब्रागडे, घूग्घूस विभाग प्रमूख विलास वनकर, कल्पना शिंदे, विमल काटकर, दुर्गा वैरागडे, अनिता झाडे, माधूरी बावणे यांच्यासह दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विविध दिव्यांग संस्थांना भेट देण्यात आली. कार्यक्रमाला दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी हेलन केअर आणि सुधा चंद्रन यांच्या जीवन चरित्राबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Reunion for the Young Chanda Brigade