परतीच्या पावसाने हिरावला दिवाळीचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 05:00 AM2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:01:30+5:30

पंधरा दिवसादरम्यान कमी कालावधीत पिकणारे धान व सोयाबीन मळणी करून बहुतेक शेतकरी विक्रीकरिता बाजारात नेतात होता. पण, यंदा पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांन खरीपातील शेतमाल विकताच आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने दिवाळी सणावर निराशेचे सावट होते.

The return of the rain Lost enjoy Diwali | परतीच्या पावसाने हिरावला दिवाळीचा आनंद

परतीच्या पावसाने हिरावला दिवाळीचा आनंद

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये निराशा : शेतमाल विक्री न झाल्याने आर्थिक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यातील शहरी भागामध्ये दिवाळी उत्साहात साजरी होत असताना ग्रामीण भागात मात्र परतीच्या पावसाने हा आनंद हिरावला आहे. दिवाळीपूर्वी दहा ते पंधरा दिवसादरम्यान कमी कालावधीत पिकणारे धान व सोयाबीन मळणी करून बहुतेक शेतकरी विक्रीकरिता बाजारात नेतात होता. पण, यंदा पावसामुळे शेकडो शेतकऱ्यांन खरीपातील शेतमाल विकताच आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाल्याने दिवाळी सणावर निराशेचे सावट होते.
जिल्ह्यात मूल, सावली, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नागभीड तालुक्यात दरवर्षी भात शेतीची लागवड वाढतच आहे. या पिकासाठी पोषक हवामान असल्याचे पाहून काही शेतकऱ्यांनी वावराच्या बांध्या तयार केल्या. मात्र, यंदा सततच्या पावसामुळे नाल्याकाठ्यावरील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. परिपक्व झालेल्या भात शेतीची सतत पडणाºया कापसामुळे कापणी करता आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हंगामाचे नियोजन बिघडले. पावसामुळे कापणी व मळणी न करणाºया शेतकºयांची संख्या जिल्ह्यात हजारोंच्या घरात आहेत.
ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यात भाताचे दाणे जमिनीवर पडून कोंब आले. भाताच्या वैरणीची गुणवत्ताही खराब झाली. अति पावसामुळे भात खाचरातील बांधाचे नुकसान होऊन माती व वाळू साचली. वाळू साचून खाचराची गुणवत्ता कमी झाली. मागील गतवर्षीप्रमाणे दिवाळी जवळ येत आल्याचे पाहून शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून विविध कार्यकारी संस्था अथवा व्यापाऱ्यांकडे शेतमाल विकण्याच्या तयारीत होते. परंतु मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यांमध्ये परतीचा पाऊस पडला. त्यामुळे परिपक्व झालेल्या सुमारे चार ते साडेचार हजार हेक्टर भात शेती नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

खरेदी केंद्रांबाबत अद्याप अनिश्चितता
जिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असल्याने विविध पिकांचे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील वर्गीकृत पिकांचा हमीभाव शासनाने जाहीर केला. या मूग, सोयाबीनचा समावेश आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे जाण्याची वेळ येणार नाही, यासाठी पणन विभागाच्या नियंत्रणात हमीभावानुसार शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्याचे जाहीर झाले होते. राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांची कार्यवाही पूर्ण झाली. परंतु, जिल्ह्यात अद्याप अनिश्चितता आहे. पावसामुळे यंदा शेतमाल विकण्यास उशीर झाला. संबंधित विभागाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करून खरेदी केंद्र निश्चित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

वीज कोसळून १२ बकऱ्या ठार
गडचांदूर : परतीच्या मुसळधार पावसासह वीज कोसळल्याने १२ बकऱ्या ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ठीक २ वाजताच्या सुमारास नारंडा येथील शिवारात घडली. बकऱ्यांचा कळप घेऊन गुराखी एका एक झाडाच्या आडोशला बसले होते. दरम्यान, अचानक वीज कोसळली. या घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य वीणाताई मालेकर, सुरेश मालेकर यांना मिळताच त्यांनी तहसील व तलाठ्यांना कळविले. नारंडा येथील पोलीस पाटील नरेश परसुटकर, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दीपक मोहूरले, मिलिंद ताकसांडे, अरूण सोंपीत्तरे आदींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. शेळीच्या मालकांची नावे कळू शकली नाही.

हळद पिकावर
पानगळचा प्रादुर्भाव

पारंपरिक पीक टाळून यंदा शेकडो शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली. परंतु सतत पडत असलेल्या पावसाचा फटका हळदी पिकाला बसला आहे. हळदीवर तांबेरा रोगाचा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पानगळ होत आहे. परिणामी, हळदीच्या उत्पादनात या वर्षी ३० टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सुमारे ६०० हेक्टरवर हळदीची लागवड झाली. पण, शेतातील पाण्याचा निचरा न झाल्याने हळद पीक वाया जाऊ शकते.

तातडीने पंचनामे करावे- सुभाष धोटे
राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील धान, सोयाबीन व कापूस उत्पादक तालुक्यातील शेतीचे २६ व २७ ऑक्टोबर रोजी आलेल्या परतीच्या पावसाने सर्वाधिक नुकसान झाले. हातचे पीक गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तयार करून नुकसान भरपाईचा अहवाल राज्य शासनाकडे तातडीने पाठविण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली आहे.

Web Title: The return of the rain Lost enjoy Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस