शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांत निकालाची धडधड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 00:43 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने १६ फेब्रुवारीला शांततेत पार पडल्या.

निकालावर लाखो रुपयांची पैज : तारीख जवळ आल्याने उमेदवार अस्वस्थचंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने १६ फेब्रुवारीला शांततेत पार पडल्या. कुठे मतदानाचा टक्का वाढला तर कुठे घटला. कुणाला किती मतदान झाले, हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार असून त्यातूनच उमेदवाराच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. गुरूवारी सकाळपासून मतमोजणी होणार असून जसजशी निकालाची तारीख जवळ येऊ लागली आहे, तस-तशी उमेदवारांची अवस्था टिकटिक वाजते डोक्यात... धडधड वाढते ठोक्यात..! काहीशी अशी झाली आहे.मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सर्वत्र शांततेत पार पडल्या. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून काही नवख्याचे राजकीय अस्तित्व सिद्ध होणार आहे. निवडणूक काळात प्रचारामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. यात सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपाचा फैरी झाडल्या होत्या. प्रत्येक उमेदवारांना मतदार राजाचे मन जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यासाठी आश्वासनाची बरसात करावी लागली होती. त्यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार बनली होती. (स्थानिक प्रतिनिधी)हेवीवेट लढतीकडे लक्षपोंभुर्णा तालुक्यातील चिंतलधाबा-घोसरी या जिल्हा परिषद क्षेत्राच्या लढतीकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. या क्षेत्रात काँग्रेसचे विनोद अहीरकर तर भाजपकडून विद्यमान जि. प. बांधकाम सभापती देवराव भोंगळे, संभाजी ब्रिगेडचे प्रा. दिलीप चौधरी हे रिंगणात होते. यात काँग्रेस व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी या क्षेत्राच्या लढतीसाठी सर्वस्व पणाला लावल्याने कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागून आहे. तसेच चिमूर तालुक्यातील शंकरपूर डोमा क्षेत्रात काँग्रेसचे माजी जि. प. अध्यक्ष डॉ. सतिश वारजुकर व भाजपाचे मनोहर रुदंये यांच्यात लढत झाली. ही लढतही काँग्रेस व भाजप पक्षाने प्रतिष्ठेची केल्याने आता निकालाची प्रतीक्षा आहे. चिमुरात १५ टेबलवर होणार मतमोजणीप्रतीक्षा असलेल्या जि. प. व पं. स. गणाची मतमोजणी सकाळी १० वाजता चिमूर तहसील कार्यालयातील राजीव गांधी सभागृहात होणार आहे. पाच गटासाठी १५ टेबलवर मतमोजणी करण्यात येणार असून एका टेबलवर पोस्टल मतदानाची मोजणी होणार आहे. २१ फेरी मध्ये मतमोजणी पूर्ण होणार असून भिसी- आंबोली गटापासून क्रमांकानुसार मतमोजणी केली जाणार आहे. स्ट्रागरुम सकाळी ९ वाजता उघडण्यात येणार असून उमेदवारानी ८.४५ वाजता यावे. मासळ रोड ते सातनाल्यापर्यंत वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. मतमोजनीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असल्याचे चिमूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मीक यांनी सांगितले. हृदयाचे ठोके वाढू लागले १६ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकांचा निकाल २३ फेब्रुवारीला लागणार आहे. त्यामुळे जशी निकालाची तारीख जवळ येवू लागली आहे, तसे रिंगणातल्या उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत. उत्सुकता वाढलीनिकालासाठी गुरुवारचा दिवस कधी उजाडतो, याची उमेदवार व कार्यकर्ते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. याची तयारी काहींनी आतापासूनच सुरु केली आहे. आपणच निवडून येणार, हा विश्वास काही उमेदवार दाखवत आहेत.लाखो रुपयांची पैजमतदानानंतर तब्बल एक आठवड्यानंतर उमेदवारांच्या भाग्याचा निकाल लागणार आहे. यामध्ये बराच वेळ मिळाल्याने ग्रामीण भागातील शौकीनांनी कोण निवडून येणार, किती फरकाने कोण विजय संपादन करणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, यावर अनेकजण लाखो रुपयांच्या पैजा लावल्या आहेत.