कोरोनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावशाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:28 IST2021-04-21T04:28:38+5:302021-04-21T04:28:38+5:30

रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, रुग्णाला व्हेंटिलेटर लागण्यापासून वाचविणे किंवा आयसीयूमधील रुग्णाचे दिवस कमी करणे तसेच ...

Remedesivir injection is not effective for coronary positive patients | कोरोनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावशाली नाही

कोरोनाच्या पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावशाली नाही

रेमडेसिविर हे इंजेक्शन कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, रुग्णाला व्हेंटिलेटर लागण्यापासून वाचविणे किंवा आयसीयूमधील रुग्णाचे दिवस कमी करणे तसेच फुफ्फुसातील संसर्ग थांबविणे यापैकी कोणत्याही कारणासाठी उपयुक्त ठरत नसल्याचे त्यांनी संशोधनाअंती म्हटले आहे. जगातल्या २८ देशांमध्ये झालेल्या संशोधनातून जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा रेमडेसिविर उपयुक्त नसल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियाने या औषधाबद्दल समाजात गैरसमज पसरविला आहे. एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि रेमडेसिविर मिळत नाही, म्हणजे आता मृत्यू अटळ आहे, हा भ्रम लोकांमध्ये तयार होणे भीतीदायक आहे. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक डाॅक्टरांवर रेमडेसिविर देण्यासाठी दबाव आणतात. रेमडेसिविरशिवाय इतर अनेक औषधींमुळे कोविड रुग्ण बरा होतो. सेवाग्राम रुग्णालयात अनेक वृद्ध रुग्णसुद्धा रेमडेसिविरचा उपयोग न करता पूर्णपणे बरे झाले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनचा अट्टहास करण्याची काहीही गरज नाही, विना रेमडेसिविर इंजेक्शननेही रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकते, असेही डाॅ. कलंत्री यांनी सांगितले आहे.

Web Title: Remedesivir injection is not effective for coronary positive patients