परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:29+5:302021-04-23T04:30:29+5:30

चंद्रपूर : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे घेण्यात आलेले परीक्षा ...

Refund exam fees to students | परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करा

परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करा

चंद्रपूर : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे, अशी मागणी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षणमंत्री वर्षा यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र सरकारने दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच महाराष्ट्राची कोविड परिस्थिती बघता, महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयासोबत सर्वच विद्यार्थी संघटना आहेत. आज अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत. परंतु त्याचे मूल्यमापन हे कशाच्या आधारावर होणार याबाबत राज्य सरकारने लवकर स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केली आहे.

कोरोना प्रादुर्भाव बघता निर्णय चांगला असला तरी आर्थिक संकटात अनेक नागरिक सापडले आहे. परीक्षा रद्द केली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना देखील त्यांच्या परीक्षा शुल्क परत केल्यास गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: Refund exam fees to students