शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांकडून केली १९.५६ लाखांची वसुली

By admin | Updated: October 16, 2015 01:25 IST

वाहन चालविण्याबाबत कितीही कठोर नियम असले तरी वाहनधारकांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी केलीच जात नसल्याचे चित्र आहे.

आठ महिन्यांतील कारवाई : ९० टक्के वाहनधारकांकडून होतेयं नियमांचे उल्लंघनचंद्रपूर: वाहन चालविण्याबाबत कितीही कठोर नियम असले तरी वाहनधारकांकडून त्याची काटेकोर अंमलबजावणी केलीच जात नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठ महिन्यात चंद्रपूरच्या वाहतूक शाखेने १९ हजार ३९० वाहनांवर कारवाई करून वाहनधारकांकडून १९ लाख ५६ हजार १७१ रुपयांचा दंड वसुल केला. चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नेहमीच चंद्रपुरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याने वाहन चालविताना काही नियम तयार करण्यात आले आहे. वाहन चालविताना कोणतीही दुर्घटना होऊ नये, किंवा कोणत्याही अनुचित घटनेला सामोरे जाण्याचा प्रसंग येऊ नये, हा ते नियम बनविण्यामागील उद्देश आहे. परंतु ९० टक्के लोकांकडून नियमांचे पालनच केले जात नसल्याचे दिसून येत आहे. वाहन चालविण्याचा परवाना देताना प्रादेशिक परिवहन विभागाकडून चालकाला नियमांबाबत अवगत केले जाते. त्याच्या हातून कुठलाही अपघात होऊ नये, यासाठी त्याला योग्य मार्गदर्शन केले जाते. मात्र नंतर वाहनचालकाला त्या नियमाचा विसर पडतो. रस्त्यावरून वाहन चालविताना नियम मोडणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. परंतु वाहनचालकांवर या कारवाईचा कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही.केवळ चंद्रपूर शहरातील कारवाईच्या आकडेवारीवरून नजर फिरविली असता, येथे वाहनचालकांकडून किती मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन केले जाते. ही बाब लक्षात येते. चंद्रपूर येथील वाहतूक शाखेने गेल्या आठ महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १९ हजार ३९० वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून १९ लाख ५६ हजार १७१ रुपयांचा दंड वसुल केला. चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, चेहऱ्या स्कार्फ बांधून वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, ट्रीपल सीट वाहन चालविणे, ध्वनी आणि वायू प्रदूषण करणे आदींबाबत ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाकडून अनेकदा कारवाईची मोहिम आरंभली जाते. अनियंत्रीत वाहन चालविणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत. मात्र या उपरांतही वाहनधारकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. गंभीर बाब म्हणजे नियम तोडणाऱ्यांमध्ये युवावर्गाचा अधिक समावेश आहे. वेगाने वाहने चालविण्याचा प्रकार शहरात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यातूनच अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. (प्रतिनिधी)