संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी राकेश रत्नावार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST2021-02-10T04:28:49+5:302021-02-10T04:28:49+5:30

मूल : रिक्त असलेल्या मूल तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अशासकीय अध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे ...

Rakesh Ratnawar as the Chairman of Sanjay Gandhi Niradhar Yojana Samiti | संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी राकेश रत्नावार

संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी राकेश रत्नावार

मूल : रिक्त असलेल्या मूल तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अशासकीय अध्यक्षपदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक राकेश रत्नावार यांची जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी यांनी नियुक्ती केली आहे.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या शिफारशीनुसार ऑक्टोबर २०२० मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या मूल तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी संजय पाटील मारकवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, संजय मारकवार यांचा अपघाती मृत्यू झाल्याने संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्षपद रिक्त होते. रिक्त असलेल्या पदावर अलीकडेच राकेश रत्नावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक असलेेेले राकेश रत्नावार हे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असून, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत.

Web Title: Rakesh Ratnawar as the Chairman of Sanjay Gandhi Niradhar Yojana Samiti