सेवानिवृत्तीनिमित्त राजेंद्र अनमदवार यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:33 IST2021-01-08T05:33:16+5:302021-01-08T05:33:16+5:30

चंद्रपूर : पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळा येथील सहायक शिक्षक राजेंद्र अनमदवार हे वयाची ५८ वर्षे पूर्ण ...

Rajendra Anmadwar felicitated on the occasion of retirement | सेवानिवृत्तीनिमित्त राजेंद्र अनमदवार यांचा सत्कार

सेवानिवृत्तीनिमित्त राजेंद्र अनमदवार यांचा सत्कार

चंद्रपूर : पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबाळा येथील सहायक शिक्षक राजेंद्र अनमदवार हे वयाची ५८ वर्षे पूर्ण करून नुकतेच सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा शिक्षक तसेच मित्रमंडळींनी सत्कार केला. यावेळी पोंभूर्णा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव मडावी, बोर्डा शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सुनील गेडाम, शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य जे. डी. पोटे, दुधारा शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र गिरडकर आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी राजेंद्र अनमदवार यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी बाबुराव मडावी, जे.डी, पोटे, गेडाम यांनी मार्गदर्शन केले. संचालन देवेंद्र गिरडकर यांनी केले. यावेळी सहाय्यक शिक्षिका निर्मला गिरडकर, किरण गेडाम, निरंजना पोटे, कल्पना मडावी, प्रेरणा मडावी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Rajendra Anmadwar felicitated on the occasion of retirement