शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे रबी पिके संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांच्या शोतील कापूस वेचणी अद्याप झाली नाही. शुक्रवारी रात्रीच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात । महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी ढगाळ वातावरण व काही ठिकाणी पावसाने हजेरी दिल्याने रबी पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, जवस पिकाची लागवड केली आहे. काही शेतकऱ्यांच्या शोतील कापूस वेचणी अद्याप झाली नाही. शुक्रवारी रात्रीच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. या पिकांचे सर्वेक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.धानाचे पोते भिजलेतळोधी बा.: नागभीड तालुक्यात शुक्रवारी रात्री अचानक मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे बाजार समिती व सेवा सहकारी सोसायटीत ठेवलेल्या शेतकºयांचे धानाचे पोते भिजले. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तळोधी परिसरातील शेतकऱ्यांनी धानाला भाव मिळावा, याकरिता मोठ्या प्रमाणात धानाचे पोते कृषी उत्पन्न बाजार समिती व सेवा सहकारी सोसायटीत आणले होते. मात्र व्यापारी कमी भाव देत असल्याने शेतकऱ्यांनी भाव वाढेल, या आशेवर धानाचे पोते बाजार समिती व सोसायटीमध्येच ठेवले. अशातच शुक्रवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे धानाचे सर्व पोते भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकºयांची चिंता वाढलीशंकरपूर : शुक्रवारी सकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने काही प्रमाणात शेतकऱ्यांची चिंता वाढवली. या परिसरातील काही गावांच्या रस्त्यावर पाणी साचले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची रबी पिके संकटात आली आहे. हरभरा, मिरची, गहू या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे रोगराई पसरत आहे. कृषी विभागाने यावर सल्ला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.लाखोळी, गहू, हरभरा धोक्यातसिंदेवाही : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. धान, गहू, लाखोळी, हरभा आदी पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने पिकांचे प्रंचड नुकसान झाले. त्यामुळे आधारभूत केंद्रात बाहेर ठेवलेले धान ओले झाले. सिंदेवाही तालुक्यात भाजीपाला उत्पादन केले जाते. या पावसामुळे भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले. गहु, हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र असेच वातावरण राहिल्यास पीक मिळणार की नाही, याची शेतकऱ्यांना चिंता आहे.

टॅग्स :Rainपाऊस