शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विविध विषयांवर जनजागृती रॅली

By admin | Updated: January 12, 2017 00:39 IST

इनरव्हील क्लब आॅफ स्मार्ट सिटी चंद्रपूरद्वारा इनरव्हील डे निमित्त मंगळवारी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांचीही उपस्थिती : वृक्ष संवर्धन व स्वच्छतेवर जागृतीचंद्रपूर : इनरव्हील क्लब आॅफ स्मार्ट सिटी चंद्रपूरद्वारा इनरव्हील डे निमित्त मंगळवारी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमुळे काही काळ चंद्रपूर नगर दुमदूमले. गांधी चौक येथे शोभाताई पोटदुखे व डॉ. पे्ररणा कोलते यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. इनरव्हील क्लब आॅफ स्मार्ट सीटीच्या अध्यक्षा शंकुतला गोयल यांनी पुष्पगुच्छ देऊन शोभातार्इंचे स्वागत केले. फाऊन्डर प्रेसिडंट डॉ.विद्या बांगडे यांनी डॉ. प्रेरणा कोलते यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.रॅलीमध्ये इनरव्हील क्लब आॅफ स्मार्ट सिटीच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या. तसेच किदवाई हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नारी शक्तीवर आधारित सर्व तेजस्वी महिलांचे रुप देखाव्याद्वारे सादर केले. तर मातोश्री विद्यालयातील १०० विद्यार्थिनींच्या चमूने सादर केलेले सुंदर लेझीम लोकांचे आकर्षण ठरले. साक्षरता अभियान, वृक्ष संवर्धन, स्वच्छता मोहिम, बेटी बचाव व बेटी पढाव, स्त्री शक्ती प्रदर्शन व सर्वधर्मसमभावच्या झाकीतील दृष्यांनी चंद्रपूर शहरातील लोकांची मने जिंकली. इनरव्हीलने राबविलेल्या सर्व प्रकल्पांचे बॅनर संपूर्ण रॅलीत लावण्यात आली होती. त्यामुळे इनरव्हीलच्या कार्यावर प्रकाश पडला. संस्थेने राबविलेले आरोग्य शिबिर, स्वसंरक्षणाचे ट्रेनिंग कॅम्प, विधी साक्षरता, पालक पाल्यांसाठी समुपदेशन, महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा, शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, समाजाचा कणा व विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक यांचा सत्कार नेशन बिल्डर अ‍ॅवार्ड देवून करणे, स्वच्छता अभियान, विद्यार्थ्यांसाठी वादविवाद, वकृत्व स्पर्धा, चित्र स्पर्धा तर गरिबांना ब्लॅकेट वाटप, वृद्धाश्रमात कार्यक्रम, यासारखे विविध उपक्रमाचे बॅनर रॅलीत लावण्यात आले होते. चेअरमन जुलेखा शुक्ला यांनी ठरविलेल्या अभिनव डिस्ट्रक्ट प्रकल्पांचे क्लबने दखल घेवून केलेल्या सुंदर उपक्रमाबद्दलची जाणीव रॅलीद्वारा समाजाला झाली. त्यानंतर जटपूरा गेट येथे हिमोग्लोबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूरचे प्रसिद्ध पॅथोलाजीस्ट डॉ. प्रमोद बांगडे व त्यांच्या चमूने सर्व विद्यार्थ्यानी व इनरव्हील सदस्यांचे हिमोग्लोबीन तपासले व डॉ.शर्मीली पोदार यांनी विद्यार्थिनींना चांगल्या व योग्य आहाराची या वयात किती आवश्यकता आहे, हे आपल्या मार्गदर्शनातून पटवून दिले.रॅलीच्या यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा शकुंतला गोयल, फाऊंडर प्रेसिटेंड डॉ. विद्या बांगडे फाऊंडर सचिव शाहीन शफीक, भारती गुंदेचा, पुनम कपूर, सुनिता जयस्वाल, छबू वैरागडे, पोर्णिमा बावणे, रमा गर्ग, राणी भाटीया, संगीता त्रिवेदी, माया त्रिवेदी, अश्लेषा गुमडेलवार, शर्मिली पोद्दार, मोना खजांची, किरण डावरा, यांनी परिश्रम घेतले.बेटी बचाव बेटी पढाव, प्रदूषण, पर्यावरण, साक्षरता, भ्रृणहत्या, विजेची बचत, इंधन बचत, जलसंर्धन व इतर विषयावरील स्लोगनने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.(शहर प्रतिनिधी)