शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

साऊंड गनच्या साहाय्याने शेतपिकांचे रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST

मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र होत आहे. यामध्ये प्रामुख्याने वन्यजीवांचे बळी जात असले तरी मानव व पाळीव प्राण्यांचे बळी जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. शिवाय वन्यप्राण्याच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेती व्यवसायही धोक्यात आला आहे. ही समस्या गंभीर बनली आहे तर शेकडो शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज केले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : आवाजाने वन्यप्राणी होतात पसार, वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका नाही

राजकुमार चुनारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन जंगलालगत आहे. त्यामुळे जंगली प्राण्याद्वारे शेतकºयांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी व वन्यप्राणी, पक्षी यांना शेतातून हाकलून लावून जंगली प्राण्यांपासून शेत पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकºयांनी आता प्लास्टिक पाईपपासून बनवलेली गन हातात घेतली आहे. हीच गन शेतकऱ्यांना वन्यजिवाकडून होणाºया पिकाच्या नुकसानीपासून वाचवणार आहे.मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र होत आहे. यामध्ये प्रामुख्याने वन्यजीवांचे बळी जात असले तरी मानव व पाळीव प्राण्यांचे बळी जाण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. शिवाय वन्यप्राण्याच्या या वाढत्या उपद्रवामुळे शेती व्यवसायही धोक्यात आला आहे. ही समस्या गंभीर बनली आहे तर शेकडो शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वनविभागाकडे अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी या गनचा पर्याय चांगला यशस्वी ठरत आहे.वाघ, बिबट यांची संख्या वाढल्यापासून ही समस्या गंभीर बनली आहे. वाघाबरोबरच गवे, माकड, मोर, हरीण, नीलगाई, डुक्कर, बिबटे अशा अनेक वन्यप्राण्यांचे शेती व पाळीव जनावरांवर आक्रमण होत असल्याने येथील शेतकरी त्रस्त आहेत. याशिवाय गवे, माकड, बिबटे व चितळ या प्राण्यांच्या उपद्रवात कमालीची वाढ झाली आहे. मात्र या पाईपपासून बनवलेली ‘साऊंड गन’ पासून कुठल्याही प्राण्यांची जीवित हानी न होता फक्त शेतातून आवाजाने हुसकावून लावण्यासाठी होतो.चिमूर तालुक्यातील खडसंगी, माकड, भानसुली, बोथली, वाहानगाव या गावातील काही शेतकºयांनी शेतात या तोफचा आवाज करणे सुरू केले. त्यामुळे शेतात येणाऱ्या रानडुकर, माकड आणि नीलगाई पळून गेल्या तर काही शेतमालकांनी या प्रयोगानंतर वन्यप्राणी शेतात आलेच नसल्याचे सांगितले. साऊंड गनमुळे शेतपिकाचे नुकसान बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आल्याचेही ते म्हणाले. ही साउंड गन शेतकºयांना दिलासा देणारी असून येत्या काळात वनविभागातील वन्यजीवग्रस्त भागात या गनचा उपयोग करण्याचा निर्णय शेतकºयांनी घेतला आहे. त्यामुळे जंगलाजवळील शेतकऱ्यांच्या हातात आता गन दिसणार आहे.ही गन असा करते आवाजप्लास्टिक पाईपपासून तयार केलेल्या या गनमध्ये मोठ्या व्यासापासून निमुळत्या व्यासाचे पाईप वापरले आहेत. त्या पाईपमध्ये वर केलेल्या छिद्रातून कारबाईट टाकून त्यावर पाण्याचे काही थेंब टाकल्यानंतर त्याला बंद केले जाते. त्यामुळे पाईपमध्ये गॅस तयार होते. नंतर गॅसला मागून लायटरद्वारे ठिणगी पडल्यानंतर यामध्ये मोठा आवाज निर्माण होतो.गनसाठी वापरले जाणारे साहित्यया गनसाठी शेतात सिंचनासाठी वापरले जाणारे कमी जाडीचे प्लास्टिक पाईप, कापलिंग, कॅप, गॅस लायटर व कारबाईट चे तुकडे वापरले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना ही गन किफायतशीर दरात मिळत आहे.प्रक्रियेमुळे होतो आवाजजेव्हा कॅल्शियम कारबाईटची प्रक्रिया पाण्यासोबत होते, तेव्हा अत्यंत ज्वलनशील गॅस तयार होते. असिटीलीन गॅसची आॅक्सिजनसोबत प्रक्रिया करून ज्वलनशील गॅस तयार होतो. जेव्हा आग लावल्या जाते, तेव्हा हे मोठा आवाज होऊन स्फोट होतो. आवाज हा पाईपच्या व्यासावर अवलंबून असतो.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती