शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी भुईमुगातून दहा लाखांचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:01 IST

परिसरातील शेतकरी नगदी पिकाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे सोयाबीन, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र ज्या पिकातून तेल मिळते ते पिके मागील अनेक वर्षापासून तालुक्यातून हद्दपार झाले होते. शेतकऱ्यांना स्वत:साठी तेल व जनावरांकरिता ठेप मिळावी यातून आर्थिक नफा व्हावा यासाठी वरोरा कृषी कार्यालयाने तालुक्यातील शेगाव येथील २५ शेतकऱ्यांची भुईमुग लागवडीकरिता निवड केली.

ठळक मुद्देवरोरा तालुका : पहिल्यांदाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला प्रयोग

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : भारत कृषी प्रधान देश असल्याने देशात धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. परंतु तेलाकरिता दुसऱ्या देशावर अवलंबून रहावे लागते. तेलबियांचे उत्पादन व्हावे यासाठी वरोरा तालुक्यात प्रथमच कृषी कार्यालयांतर्गत शेतकऱ्यांना मोफत बियाने देवून उन्हाळी भुईमुग लावण्याचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना दहा लाखांचे उत्पादन झाले आहे.परिसरातील शेतकरी नगदी पिकाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे सोयाबीन, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र ज्या पिकातून तेल मिळते ते पिके मागील अनेक वर्षापासून तालुक्यातून हद्दपार झाले होते. शेतकऱ्यांना स्वत:साठी तेल व जनावरांकरिता ठेप मिळावी यातून आर्थिक नफा व्हावा यासाठी वरोरा कृषी कार्यालयाने तालुक्यातील शेगाव येथील २५ शेतकऱ्यांची भुईमुग लागवडीकरिता निवड केली. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या वतीने भुईमुंगाचे मोफत बियाणे पुरविण्यात आले.शेगाव मंडळकृषी अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये भुईमुंगाची लागवड केली. भुईमुग लागवडीमुळे एकाच शेतात, एकाच वर्षात तीन पिके घेण्याची किमया शेतकऱ्यांना साधता आली. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना दोनशे क्विंटल उन्हाळी भुईमुगाचे पीक झाले. यातून दहा लाख रुपयांची कमाई झाली. यामुळे पुढील वर्षी उन्हाळी भुईमुग क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.स्थानिक बाजारपेठेत भुईमुगाची विक्रीवरोरा तसेच माढेळी येथील बाजारपेठेत उन्हाळी भुईमुंग पाच हजार रुपये प्रती क्विंटल प्रमाणे विकण्यात आले. बाजारपेठ उपलब्ध झाल्याने भुईमुंग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना बाजारात किरकोळ विक्री केल्याने त्यांनाही आर्थिक लाभही झाला.सोयाबिन पिकानंतर हरभऱ्याचे पीक घेतले जाते. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवट उन्हाळी भुईमुग लावल्यास उत्पादन चांगले होते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. मे महिन्यात उन्हाळी भुईमुग निघून शेताची मशागत करुन हंगामात दुसऱ्या पिकाची पेरणी करता येईल.- व्ही. आर. प्रकाश,तालुका कृषी अधिकारी, वरोरा

टॅग्स :agricultureशेती