आमदारांनी जाणून घेतल्या खेळाडूंच्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:30 IST2020-12-06T04:30:40+5:302020-12-06T04:30:40+5:30

राजुरा : तालुक्यातील क्रीडा प्रेमी युवकांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या तालुका क्रीडा संकुल येथे आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन ...

The problems of the players that the legislators have learned | आमदारांनी जाणून घेतल्या खेळाडूंच्या समस्या

आमदारांनी जाणून घेतल्या खेळाडूंच्या समस्या

राजुरा : तालुक्यातील क्रीडा प्रेमी युवकांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या तालुका क्रीडा संकुल येथे आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी खेळाडूंच्या समस्या, क्रीडा संकुलाच्या समस्या तसेच क्रीडा संकुल नुतनीकरणाचा आढावा घेतला.

मागील अनेक वर्षांपासून राजुरा तालुक्यातील क्रीडा संकुल दुर्लक्षित आणि बकाल अवस्थेत आहे. येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास तालुक्यातील क्रीडा प्रेमींना चालना मिळू शकते. त्यामुळे आमदार धोटे यांनी भेट देवून समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदारांच्या हस्ते काही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. राजुरा तालुक्यातील क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगराध्यक्ष अरूण धोटे, कार्यकारी नगराध्यक्ष सुनिल देशपांडे, तहसीलदार हरिश गाडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, नगरसेवक हरजितसिंग संधू, शहर अध्यक्ष अशोक राव, ॲड चांदेकर, तालुका क्रीडा अधिकारी राजु वडसे, वास्तुशिल्प तज्ज्ञ दिनेश नवनारे, पूर्वा खेरकर, मयुर खेरकर, योगीता भोयर, असद कूरेशी, पाशा शेख, छत्रपती क्रीडा अकादमीचे विद्यार्थी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Web Title: The problems of the players that the legislators have learned