शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

वनविकास महामंडळातील समस्या निकाली काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST

व्यवस्थापकीय संचालकांचे संघटनेला आश्वासनचंद्रपूर :वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहे. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, ...

व्यवस्थापकीय संचालकांचे संघटनेला आश्वासनचंद्रपूर :वनविकास महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहे. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेने वारंवार निवेदन दिले आहे. दरम्यान, नुकतीच वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी प्रलंबित असलेल्या मागण्या तत्काळ निकाली काढण्याचे आश्वासन नागपूर एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा वाढल्या आहे.

बैठकीला एफडीसीएमचे मुख्य महाव्यवस्थापक मुख्यालय ॰ीनिवास राव, यांच्यासह संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष बी.बी. पाटील, सरचिटणीस रमेश बलैया, कोषाध्यक्ष साहेबराव चापले, रवी रोटे, राहूल वाघ, अशोक तुंगीडवार, टी.एच. हरिणखेडे, विक्रम राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, प्रोत्साहन भत्ता दिवाळीपूर्वी वितरण केल्याबद्दल व्यवस्थापकीय संचालकांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सातवा वेतन लागू करावा, कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता द्यावा, नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता द्यावा, रिक्त पदे तत्काळ भरावी, सुधारिक शासन निर्णयाप्रमाणे एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांना वेतन॰ेणीचा लाभ देवून एकतर पदोन्नतीचा वनविभागाप्रमाणे लाभ द्यावा, कर्मचारी, वनमजूर सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या वारस अनुकंपाधारकांना आस्थापनावर घ्यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी सातवा वेतन लागू करण्याची कार्यवाही शासन स्तरावर प्रलंबित आहे. तत्काळ मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करीत असून मंजुरी मिळताच सातवा वेतन आयोग लागू करण्यात येईल, तसेच इतरही मागण्या त्वरित सोडविण्यात येईल, याबाबत संचालक मंडळाच्या सभेत ठराव पारित करून कर्मचाऱ्यांना न्याय देवू असे आश्वासन व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी संघटनेला दिले.