शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या पोलीस बळाने अनेक अडचणी

By admin | Updated: March 22, 2015 00:09 IST

तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १०२ गावांचा समावेश असून या गावांतील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी केवळ ३४ कर्मचाऱ्यांवर

वरोरा : तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १०२ गावांचा समावेश असून या गावांतील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी केवळ ३४ कर्मचाऱ्यांवर असल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक आहेत. आहे. परिणामी गुन्हेगारही शिरजोर बनत असून गुन्हा घडल्यानंतरही पोलीस घटनास्थळी पोहोचू शकत नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यामध्ये १०२ गावांचा समावेश आहे. शेगावपासून अनेक गावे २५ ते ३० किलोमिटर अंतरापर्यंत आहे. शेगाव पोलीस ठाण्यात केवळ एकच वाहन आहे. या पोलीस ठाण्याअंतर्गत वरोरा, चिमूर तसेच शेगाव, चंदनखेडा भद्रावती या मुख्य मार्गावरील अपघात, वाहतूक विस्कळीत होणे यासोबतच भटाळा व रामदेगी पर्यटनस्थळी भरणाऱ्या जत्रेतही शेगाव पोलिसांनाच बंदोबस्त करावा लागत आहे. येथे कार्यरत ३४ कर्मचाऱ्यांमध्ये एक सहाय्यक पोलीस अधिकारी, आठ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व उर्वरीत पोलीस कर्मचारी कार्यरत असून, पोलीस उपनिरीक्षकाचे पद रिक्त आहे.पोलीस ठाण्याच्या स्थापनेपासून पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित केली गेली आहे. सध्या बदलत्या काळात वाढलेली लोकसंख्या, गुन्ह्याचे नवीन नवीन तंत्र गुन्हेगारांनी विकसित केले आहे. गावामधील तंट्याचे प्रमाणे वाढले आहे. त्यामुळे एका-एका कर्मचाऱ्यावर अनेक गावांचा भार देण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांची कर्तव्य बजावित असताना चांगलीच अडचण वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गावालगत ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे.या प्रकल्पातील वन्य प्राणी विशेषत: वाघ गावात येण्याच्या घटना घडत असतात. वाघ बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याने कायदा व सुव्यवस्था बघण्याची जबाबदारी शेगाव पोलिसांना पार पाडाखी लागते. कामाच्या व्यापामुळे नागरिकांचे कामेही प्रलंबित राहत असतात. त्यामुळे शेगाव पोलीस ठाण्यात पोलीस बळ वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)