शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
4
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
5
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
6
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
7
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
8
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
9
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
10
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
11
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
12
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
13
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
14
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
15
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
16
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
17
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
18
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
19
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
20
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कोळसा खाणी कोल इंडियालाच द्याव्यात - हंसराज अहीर

By admin | Updated: December 13, 2014 01:21 IST

वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा लढा शेतकऱ्यांच्या संघर्षमय भूमिकेने जिंकल्या गेला. आता अन्य प्रकल्पग्रस्तांनाही त्यांच्या जमिनीचा पुरेसा मोबदला मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत.

भद्रावती : वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा लढा शेतकऱ्यांच्या संघर्षमय भूमिकेने जिंकल्या गेला. आता अन्य प्रकल्पग्रस्तांनाही त्यांच्या जमिनीचा पुरेसा मोबदला मिळवून देण्याचे प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याकरिता सर्व खासगी कोल ब्लॉक्स कोल इंडियाला देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. भद्रावती तालुक्यातील किलोनी येथे आयोजित प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
ते म्हणाले, देशात ब्रिटीशांच्या काळापासून अंमलात आलेला भूमी अधिग्रहण १८९४ च्या काळ्या कायद्यामुळे देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या लुटल्या गेला. या शेतकऱ्यांची मानसिक कोंडी सातत्याने झाली. चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणींसाठी संपादित झालेल्या जमिनीशी निगडित शेतकऱ्यांना या कायद्याने उद्ध्वस्त केले. त्यामुळे या कायद्याविरूद्ध १९९८ पासून आम्ही लढा देऊन हा कायदा बदलण्यात मोलाचे कार्य केले. या कायद्यात अनेक दुरूस्त्या सुचविण्यातही आम्ही यशस्वी ठरलो. मात्र या लढ्यासाठी ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी समर्थपणे साथ दिली व आपल्या पदरात न्याय पाडून घेतला ते शेतकरी या यशाचे खरे शिल्पकार होते, असेही ना.अहीर म्हणाले. आम्ही वेकोलिच्या प्रकल्पग्रस्तांचा लढा जिंकला आहे. आता अन्य प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही सत्तेत राहून हा लढा मार्गी लावू वेळप्रसंगी संघर्षाची भूमिका स्विकारावी लागेल तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तशी भूमिका स्विकारू, असे अभिवचन केंद्रीय राज्यमंत्री अहीर यांनी हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने दिले.
अहीर पुढे म्हणाले, वेकोलि प्रकल्पग्रस्तांना ६ ते १० लक्ष प्रती एकरी मोबदला मिळवून दिला. याचा लाभ नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील तसेच सावनेर, उमरेड आदी ठिकाणच्या खाण प्रकल्पग्रस्तांनाच मिळाला नसून तो देशभरातील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांना मिळाला. आता अन्य प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची वेळ आली आहे. व त्यासाठी आपण सज्ज आहोत. सेंट्रल कॉलरीज माईन्स, सनफ्लॅग माईन्स, कर्नाटका एम्टा माईन्स, बैद्यनाथ माईन्समध्ये हजारो हेक्टर शेतजमिनी मातीमोल भावाने संपादीत झाल्या असून एकट्या बैद्यनाथने २६२ हेक्टर शेतजमिनी घेतल्या. ब्लॉक घेतले व उद्योग सुरू केले. परंतु शेतकऱ्यांना न्याय दिला नाही. या अन्यायविरूद्ध शेतकऱ्यांच्या सोबतीने या क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून लढा उभारू. डागानी प्रति एकर ६ ते १५ हजार, कर्नाटक एम्टाने १.५ ते ४ लाख भाव देऊन शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक केली. कर्नाटक एम्टाने मर्यादा ओलांडून जमिन मालकांनाच जेलमध्ये डांबले, पोलिसांकरवी मारले, उपाशी ठेवले एम्टावाल्याना कदापीही माफ करणार नाही, असे ते म्हणाले. या मेळाव्याला राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे, राहूल सराफ, ओम मांडवकर, नरेंंद्र जिवतोडे, अशोक हजारे, रवी नागपुरे, अर्चना नरेंद्र जिवतोडे, प्रवीण सातपुते यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)