शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्र्यांचा चलनबंदी निर्णय राष्ट्र विकासासाठी आवश्यक

By admin | Updated: November 19, 2016 00:57 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० नोटा चलनातून बंद करून देशात निर्माण होणाऱ्या...

हंसराज अहीर यांचे आवाहन : अफवांवर विश्वास ठेवू नये चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० नोटा चलनातून बंद करून देशात निर्माण होणाऱ्या काळ्या पैशावर घाळा घालण्याचे पाऊल उचलले आहे. यामुळे दहशतवादी व नक्षलवाद्यांसह अतिरेकी कारवाई संलग्न असणाऱ्यांना आता काळ्या पैशाविना मोठ्या प्रमाणात आडकाठी निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे भविष्यात अर्थव्यवस्थेला उभारी येण्यासोबत विकासासाठी मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जनतेने विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून चलनबंदीच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.या संदर्भात बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले की, देशात चलनबंदीचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध बँकात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कार्य करून ग्राहकांना उचित सेवा उपलब्ध दिली. त्यामुळे केंद्र सरकारच्या चलनबंदीचा निर्णय राबविण्यात मदत झाली आहे. याआधी जनधन योजनेच्या अंमलबजावणीसाठी बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी असेच स्पृहनिय कार्य केले असल्याने पुढेही असेच पुढे येवून राष्ट्रीय कार्यात सहभाग घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पंतप्रधान यांच्या चलनबंदीच्या निर्णयामुळे काळा पैसा मोठ्या प्रमाणात नष्ट होणार असून याचा फायदा सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात होणार आहे. जनतेने बँकेच्या माध्यमाने चलनबदलासाठी होत असलेला थोडा त्रास सहन केला तर पुढे भविष्यातील पिढीला विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी ध्येर्य राखत आपले व्यवहार करण्याचे आणि विरोधकांच्या अफवांवर विश्वास न ठेवता निर्णयाचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)