१३ इसमांवर प्रतिबंधात्मक पोलिसांकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST2020-12-13T04:41:23+5:302020-12-13T04:41:23+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात कलम १०७ दंड प्रक्रिया अन्वये ४५, कलम ११० दंड प्रक्रिया संहिता अन्वये एक, कलम ११०, ११७ ...

Preventive police action on 13 cases | १३ इसमांवर प्रतिबंधात्मक पोलिसांकडून कारवाई

१३ इसमांवर प्रतिबंधात्मक पोलिसांकडून कारवाई

चंद्रपूर : जिल्ह्यात कलम १०७ दंड प्रक्रिया अन्वये ४५, कलम ११० दंड प्रक्रिया संहिता अन्वये एक, कलम ११०, ११७ मुंबई पोलीस कायदा अन्वये सहा, कलम ९३ दारुबंदी कायदा अन्वये सहा अशा १३ इसमांवर पोलिसांनी शुक्रवारी प्रतिबंधक कारवाई केली.

रस्त्यावर वाहन ठेवणाºयांवर गुन्हा

चंद्रपूर : निष्काळजीपणे रस्त्यावर वाहन ठेऊन नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाºया ११ वाहनचालकांवर वेगवेळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये दुर्गापूर पोलिसांनी एक, ब्रह्मपुरी तीन, वरोरा एक, पाथरी, गोंडपिंपरी, गडचांदूर पोलिसांनी प्रत्येकी दोन वाहनचालकांवर कारवाई केली.

अतिक्रमण हटाव

मोहीम थंडबस्त्यात

चंद्रपूर : तुकूम- दुर्गापूर मुख्य रस्त्याव अनेकांनी अतिक्रमण केले. दोन वर्षांपूर्वी मनपाने अतिक्रमणधारकांना नोटीस बजावले होते. दरम्यान काहींनी अतिक्रमधारकांनी स्वत:च अतिक्रमण हटविले. मात्र अनेकांचे अतिक्रमण जैसे-थे आहे.

तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरावी

सिंदेवाही : येथील तहसील कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत़ त्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित आहेत. राज्य शासनाने आकृतीबंधानुसार रिक्त पदे भरण्याची मागणी तालुक्यातील सरपंचांनी निवेदनातून केली आहे.

Web Title: Preventive police action on 13 cases