शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय चर्चासत्रात मिशन नवचेतनाचे सादरीकरण

By admin | Updated: December 24, 2015 01:16 IST

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या चर्चासत्रात ...

उपक्रम प्रेरणादायी : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिपादनचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या चर्चासत्रात मिशन नवचेतनाचे सादरीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. यावेळी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, प्रदेश जिल्हा परिषद केंद्र प्रमुख संघाचे राज्याध्यक्ष अर्जून साळवे यांची मंचावर उपस्थिती होती.यावेळी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात मिशन नवचेतना सुरू करण्याकरीता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णयाचे अवलोकन केले. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा प्रगत करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे उद्दिष्टे साध्य करणे, जिल्हा परिषदेच्या शाळेत ज्ञानरचनावादाची व एक्टीव्हीटी बेस लर्निंग अध्यापन पद्धतीची अंमलबजावणी करणे, ग्रामीण भागातील गुणवत्ता कार्यक्रम अंतर्गत श्रेणी सुधार कार्यक्रमाची अंमलबजावणीे करणे, शिक्षकांना प्रेरणा देवून त्यांच्याशी संवाद साधने, ही उद्दीष्टे निश्चित केली आहेत. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरीता जिल्हास्तरावर थिंक टँक तज्ज्ञ शिक्षकांचा गट तयार करण्यात आलेला आहे, असे त्यांनी सांगितले.तालुकास्तरावर भाषा, गणित, इंग्रजी ब्रिगेड स्थापन करण्यात आलेली आहे. या ब्रिगेड सदस्यांना दर महिन्याला जिल्हास्तरावर साधन व्यक्ती यांच्या मार्फतीने प्रशिक्षण दिले जाते. जिल्ह्यात एकूण १४० केंद्र आहेत यात नगर परिषदेचे सहा, जिल्हा परिषदेचे १३३ केंद्र आहेत. ब्रिगेडच्या सहकार्याने या १३३ केंद्रात दर महिन्याला केंद्र संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षात एकूण ८ केंद्र सम्मेलन आयोजन करण्यात येणार आहे. या मिशन अंतर्गत जिल्ह्यातील १३३ शाळेची मॉडेल केंद्र म्हणून निवड करण्यात आली आहे. मिशन नवचेतना कार्यक्रमासाठी जिल्हा वार्षिक नियोजनातून ४५.०० लक्ष रुपये मंजूर झाले असून १३३ शाळा जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे, असे त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)