शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीने पोलिसांवरचा ताण वाढला

By admin | Updated: April 25, 2015 01:29 IST

लोकसंख्येच्या दृष्टीने अगोदरच मनुष्यबळ कमी आणि त्यातच दारुबंदी झाल्यामुळे पोलिसांवरचा ताण वाढला आहे.

नागभीड : लोकसंख्येच्या दृष्टीने अगोदरच मनुष्यबळ कमी आणि त्यातच दारुबंदी झाल्यामुळे पोलिसांवरचा ताण वाढला आहे. या ताणाचा त्यांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याची पोलीस वर्तुळात चर्चा आहे. एवढेच नाही तर जुने तपासाची अनेक प्रकरणे पेडिंग पडत असल्याचेही बोलल्या जात आहे.नागभीड तालुक्यात गावांची संख्या ११४ आहे. येथील लोकसंंख्या १ लाख २६ हजार असून नागभीड तालुका ५१ हजार ६६६ हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तारला आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्रफळाच्या या तालुक्यात केवळ नागभीड येथेच एक पोलीस ठाणे आहे. संपूर्ण तालुक्याची शांतता व सुव्यवस्था राखण्यात आतापर्यंत येथील पोलिसांची दमछाक होत होती. त्यातच आता १ एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यात आल्याने पोलिसांवरचा भार आणखी वाढला आहे.नागभीड तालुक्याची सीमाही दारुमुक्त असलेल्या भंडारा आणि नागपूर या जिल्ह्यांना लागून असल्याने दारुबंदी यशस्वी होण्यासाठी येथील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. यासाठी कान्पा आणि बाम्हणी येथे पोलीस चौक्या बसवण्यात आल्या आहेत. नागभीड पोलीस ठाण्यात सध्यास्थितीत एक पोलीस निरीक्षक, तीन सहा. पोलीस निरीक्षक आणि ५० शिपाई जमदार कार्यरत आहेत. यातील एक सहा. पोलीस निरीक्षक आणि १४ शिपाई यांची केवळ दारु बंदीच्या कर्तव्यावर असून उरलेल्या केवळ ३५ शिपाई जमदारांवर तालुक्याची व्यवस्था आहे. (तालुका प्रतिनिधी)