पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 15:23 IST2022-01-20T13:19:27+5:302022-01-20T15:23:04+5:30

आरोपी लालश्याम हा यापूर्वी ब्रह्मपुरी ठाण्यात कार्यरत होता. तेव्हा त्याची पीडितेसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केला.

Police constable sexually abused a married woman | पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

पोलिसाचा विवाहित महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

चंद्रपूर : पाथरी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस शिपायाने ब्रह्मपुरी येथील टिळकनगरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली.

लालश्याम बाबूराव मेश्राम (५१) असे अत्याचार करणाऱ्या पोलीस शिपायाचे नाव आहे. फिर्यादी पीडित महिलेच्या तक्रारीवरून लालश्याम मेश्राम याला ब्रह्मपुरी पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याविरुध्द विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी लालश्याम हा यापूर्वी ब्रह्मपुरी ठाण्यात कार्यरत होता. तेव्हा त्याची पीडितेसोबत ओळख झाली. त्यानंतर त्याने पीडितेवर अत्याचार केला. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत.

Web Title: Police constable sexually abused a married woman