शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर फिरल्यास पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे राजेश मोहिते ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. कोरोना विषाणूचा प्रसार हा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपकार्तून होत असतो. ही गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाली आहे. रस्त्यावर गर्दी अथवा फिरताना दिसल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. संकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहततील.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे राजेश मोहिते ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यात विदेशातून आलेल्या ४ नागरिकांना निगराणी ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या ८ नागरिकांना उत्तम आरोग्यानंतर धोक्याबाहेर सांगण्यात आले. आणखी ६ नव्याने विदेशातून आलेल्या नागरिकांना कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. पुणे,मुंबई व इतर जिल्ह्यातून आलेले नागरिक होम कॉरेन्टाईन करण्यात आलेले आहेत. यापैकी काही प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प मारण्यात आले आहे. त्यांना केवळ पुढील १४ दिवस काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. त्या पद्धतीची लक्षणे दिसल्यास आरोग्य यंत्रणेची मदत घेणे अनिवार्य आहे. मात्र स्वत:ला धोक्यात समजण्याचे कारण नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.स्टॅम्प मारले म्हणजे कोरोनाचे रूग्ण नव्हेपरदेशातून तसेच पुणे,मुंबई या ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे. या सर्वांच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे व होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. अशा व्यक्तींनी कुठेही न जाता त्यांनी १४ दिवस घरातच स्वतंत्र खोलीमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे. या गृहभेटी आशा,अंगणवाडीसेविका यांच्यामार्फत देण्यात आल्या. दोन दिवसात ग्रामीण भागात सर्व तालुक्यामध्ये २ हजार ६६६ नागरिकांची नोंद घेण्यात आली. विदेशातून बाहेरून आलेले अन्य राज्यातून आलेले सर्व नागरिक यामध्ये आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या