शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौचास बसणाऱ्या ५२ जणांवर पोलीस कारवाई

By admin | Updated: December 22, 2016 01:44 IST

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत मूल व बल्लारपूर नगर परिषदेने वैयक्तिक शौचालय

मूल व बल्लारपुरात गूडमार्निंग पथक : मुख्याधिकाऱ्यांचा पुढाकार मूल/बल्लारपूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत मूल व बल्लारपूर नगर परिषदेने वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी विशेष प्रयत्न चालविल्यानंतर मूल शहरात १ हजार ६७५ लाभार्थ्यांना प्रति १५ हजार रुपयाचे अनुदान वितरीत केले. तसेच ६ ठिकाणी वैयक्तिक शौचालयाची दुरुस्ती व एक फिरते शौचालय उभारुन शहर हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प मूलचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक व बल्लारपूरचे मुख्याधिकारी विपीन मुदधा यांनी केला. त्या अनुषंगाने गुडमार्निंग पथकाची निर्मिती करून उघड्यावर शौचालय बसणाऱ्या ५२ जणांवर मंगळवारी पोलीस कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या शौचालय योजनेचा १ हजार २३३ लाभार्थी वापर करताना दिसत आहेत. गेल्या २० वर्षांपासून बंद असलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती करण्यात आली असून यात सोमनाथ रोड, चितेगाव रोड, आठवडी बाजार, वरठी बोडी, शिवमाराई, वनविभाग, बसस्थानक या ठिकाणाचा समावेश आहे. माराई मंदिराकडे सार्वजनिक शौचालय नसल्याने तात्पुरत्या स्वरुपात सहा सिट असलेले फिरते शौचालय उभारण्यात आले आहे. ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय आहे, त्या ठिकाणी उघड्यावर शौचालयाकडे जाणाऱ्याची संख्या अधिक असल्याने रस्त्यारस्त्यावर घाण साचलेली असते. त्यामुळे विविध आजाराचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. आरोग्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यानी रितसर ४५० जणांना नोटीस बजावून उघड्यावर शौचास न बसता सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा तसेच वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अर्ज सादर करण्याबाबत कळविले. १९ डिसेंबरला ‘गुड मार्निंग’ या भरारी पथकाची निर्मिती करून उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना सकाळी त्या ठिकाणी जावून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११५(अ,ब) व ११७ अन्वये सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.तर बल्लारपुरातही ४६ जणांवर ही कारवाई करण्यात आली. बल्लारपुरात ४६ जणांवर गुन्हा दाखल बल्लारपूर : येथील नगरपालिका प्रशासनाने शौचालय बांधकाम करून त्याचा वापर करावा, उघड्यावर शौचास जाऊ नये, यासाठी लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले. मात्र काहींनी अद्याप बांधकाम सुरू केले नाही. अनुदानाचा वापर शौचालय बांधकामासाठी न केल्यामुळे येथील राजेंद्र प्रसाद वॉर्डातील तीन, बालाजी वार्ड, पंडिय दिनदयाल वार्ड, मौलाना आझाद वार्ड, महात्मा गांधी वॉर्डातील प्रत्येक दोन, बुद्धनगर, शिवनगर, राणी लक्ष्मी वार्ड व लोकमान्य टिळक वॉर्डातील प्रत्येकी तीन तर संतोषी माता वॉर्डातील सहा व रविंद्र नगर वॉर्डातील १३ असे एकूण ४६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या लाभार्थ्यांनाकडून ‘स्वच्छ शहर, स्वच्छ महाराष्ट्र मिशन’ला गालबोट लावण्याचा प्रकार घडला आहे. बल्लारपूर नगरपरिषद प्रशासनाने गुडमार्निंग पथकाच्या माध्यमातून शहरातील मोकळ्या जागा व बाहेरील भागात गस्त घालण्याची मोहिम सुरू केली. मुख्याधिकारी विपीन मुद्धा, तेजबहादूर थापा यांच्या तपासणीत दोषी आढळून आलेल्यांवर कारवाई करण्यात आली. यामुळे शहरात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मूल शहर ३१ डिसेंबरपर्यंत हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प आहे. त्यानुसार १९ डिसेंबरपासून गुडमार्निंग पथक निर्माण करून कारवाई सुरू आहे. पहिल्या दिवशी सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी सार्वजनिक शौचालयाचा वावर करावा तसेच ज्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांनी त्वरीत पालिकेत संपर्क करून शौचालय मंजुरीबाबत प्रस्ताव सादर करावा. - अभय चेपूरवार, आरोग्य निरीक्षक, न.प. मूल.