शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कचरा घोटाळ्यासंदर्भात न्यायालयात दाद मागणार

By admin | Updated: February 25, 2015 01:21 IST

महानगरपालिकेने घनकचरा संकलनाचे कंत्राट नागपूर येथील सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या कंपनीला दिले आहे. यासाठी मनपाला प्रतिमहिना ५४ लाख रुपये मोजावे लागणार आहे.

चंद्रपूर : महानगरपालिकेने घनकचरा संकलनाचे कंत्राट नागपूर येथील सेंट्रल फॉर डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या कंपनीला दिले आहे. यासाठी मनपाला प्रतिमहिना ५४ लाख रुपये मोजावे लागणार आहे. सदर कंत्राट देताना सत्ताधाऱ्यांनी नियमाला तिरांजली दिली आहे. सत्ताधारी महानगरपालिकेच्या पैशाची उधळपट्टी करीत असून यासंदर्भात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती नगरसेवक प्रविण पडवेकर, नगरसेविका सुनिता लोढिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.घनकचरा जमा करून डम्पींग यार्डवर टाकण्यासाठी महापालिकेने यापूर्वीच त्याच कंपनीला २० लाख रुपये प्रति महिन्याचे कंत्राट दिले आहे. सदर कंत्राट रद्द करून सत्ताधाऱ्यांनी सामान्य नागरिकांच्या हिताचा कोणताही विचार न करताना त्याच कंपनीला दरमहा ५४ लाख रुपयांप्रमाणे कचरा संकलनाचे काम दिले आहे. केवळ एकाच वर्षात २० लाखांवरून ५४ लाख रुपयांचे कंत्राट देण्यामागील उद्देश स्पष्ट झाला नसल्याते ते म्हणाले. विशेष म्हणजे, भाजपाची सत्ता महानगरपालिकेत येताच कचरा उचलण्यासाठी दरमहा ५४ लाख देण्याएवढा कचरा आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, आमदार नाना श्यामकुळे यांना यात लक्ष घालण्याची विनंती करूनही याकडे दूर्लक्ष केल्याचा आरोप नागरकर यांनी केला. सर्व पदाधिकाऱ्यांनी संगनमताने कचरा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यासंदर्भात विभागीय आयुक्त आणि लाचलुतपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)