अजय संस्थेतर्फे १०० वृक्षाचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:31 IST2021-08-19T04:31:31+5:302021-08-19T04:31:31+5:30

चंद्रपूर : सह्याद्री देवराई महाराष्ट्र राज्य व सरपंच परिषद-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र दिनानिमित्त ‘झाडांचे शतक, शतकांसाठीची झाड’ ...

Planting of 100 trees by Ajay Sanstha | अजय संस्थेतर्फे १०० वृक्षाचे रोपण

अजय संस्थेतर्फे १०० वृक्षाचे रोपण

चंद्रपूर : सह्याद्री देवराई महाराष्ट्र राज्य व सरपंच परिषद-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र दिनानिमित्त ‘झाडांचे शतक, शतकांसाठीची झाड’ ही चळवळ सुरू करण्यात आली. या अनुषंगाने चंद्रपूर येथील अजय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यातंर्गत विविध प्रजातींचे शंभर झाडांचे रोपण करण्यात आले. बोरगाव येथील १०२ वर्षाच्या वयोवृद्ध आजी व ९९ वर्षाचे आजोबा तुकाराम बोरकुटे यांच्या हस्ते झाडे लावून उपक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बोरगाव येथील ग्रामपंचायत परिसर, जि.प. शाळेतील पटांगण तसेच मोकळ्या जागी वड, पिंपळ, आवळा, चिंच, अनार, चारोळी, अशोक, काटेसावर, मोह, कडुनिंब यासारखे झाडे लावून झाडांचे शतक पूर्ण करण्यात आले. यावेळी अजय बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष स्वाती धोटकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Planting of 100 trees by Ajay Sanstha