शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी लाट गृहित धरून नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 05:00 IST

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, फॅसिलिटी अ‍ॅप पोर्टलमध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची उपलब्ध माहिती पोर्टलवर अपडेट करावी. पोर्टलवर एंट्रीमध्ये रुग्णाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी आवश्यक बाबींची माहिती अद्ययावत करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेला गृहीत धरून हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व काही अतिरिक्त फॅसिलिटी वाढविण्यासाठी जागा पाहून ठेवावी.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी अजय गुल्हाने : ऑक्सिजन निर्मिती प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :   शासनाकडून अद्याप तिसऱ्या लाटेबद्दल सूचना नसली, तरी संभाव्य धोका लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी तयारीत राहावे. औषधी, मनुष्यबळ, आरोग्य तपासणी, आयसीयू व व्हेंटिलेटर बेड्सचे नियोजन आतापासूनच करून ठेवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोविडविषयक आढावा बैठकीत गुरुवारी दिले. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, अधिष्ठाता डॉ. टेकाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मुख्याधिकारी विजय सरनाईक व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, फॅसिलिटी अ‍ॅप पोर्टलमध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेडची संख्या, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची उपलब्ध माहिती पोर्टलवर अपडेट करावी. पोर्टलवर एंट्रीमध्ये रुग्णाचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी आवश्यक बाबींची माहिती अद्ययावत करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेला गृहीत धरून हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व काही अतिरिक्त फॅसिलिटी वाढविण्यासाठी जागा पाहून ठेवावी. तसा प्रस्ताव तातडीने सादर करावा. जिल्ह्यात नो मास्क, नो एन्ट्री ही मोहीम यशस्वी झाली. ही मोहीम सुरू करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. यावेळी तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांची व्हिसीव्दारे संवाद साधला.

२० मे रोजी पंतप्रधान घेणार आढावापंतप्रधान देशभरातील जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे सादरीकरण करताना डिस्चार्ज  रूग्ण, दैनंदिन बाधित रूग्ण, मृत्यू, अ‍ॅक्टिव्ह रूग्ण, आरटीपीसीआर, अँटिजेन तपासणी, आयएलआय व सारी रूग्णांची माहिती अपडेट ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्या