शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मिरची पूड डोळ्यात टाकून लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 00:56 IST

रस्त्याने जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील रोख रकमेची बॅग लंपास करणाऱ्या टोळीला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या....

सहा जणांना अटक : ८ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर : रस्त्याने जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील रोख रकमेची बॅग लंपास करणाऱ्या टोळीला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या टोळीत सहाजणांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. फईम अबरार शेख (२४), शाहरूख अली अहमद अली (१८), शेख अजहर शेख मेहराज (२४), मेहबूब आलाम आकत खान (२२), सद्दाम हुसेन अफसर हुसेन व फरहान शेख शब्बीर शेख अशी आरोपींची नावे असून हे सर्वजण चंद्रपूर शहरातील रहिवासी आहेत. २५ जानेवारीला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट मार्गावर ही लुटमारीची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. परंतु शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने हे आव्हान स्विकारून आरोपींना जेरबंद केले. विशेष म्हणजे ७ सप्टेंबर २०१५ रोजी स्थानिक श्री टॉकीज परिसरात शब्बीर लक्कडशाह व मुर्तुजा लक्कडशाह या व्यापाऱ्यांजवळी पाच लाख रुपये भरून असलेली बॅगही या टोळीतील आरोपींनीच लंपास केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. (पान ४ वर)लाईफ स्टाईल बदलल्याने उघडले रहस्यलुटमारप्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयितांची माहिती गोळा केली. त्यानुसार त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते चंद्रपुरात सापडले नाहीत. त्यांच्या शोधासाठी नागपूर, हैदराबाद, राजुरा येथे पथक पाठविण्यात आले. सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यात आले. सोबतच ११७ दुचाकी वाहनांची चौकशी केली. खबऱ्यांना पाळत ठेवण्याच्या सुचना पोलिसांनी केल्या होत्या. यादरम्यान, एका गरीब युवकाजवळ महागडी पल्सर दुचाकी असल्याचे व त्याची लाईफ स्टाईल अचानक बदलल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली. याच आधारावर चौकशी करीत सदर युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर मुख्य आरोपी फईम शेख हा २५ जानेवारीच्या लुटमारीतील सर्व मुद्देमाल घेऊन पळून गेला, अशी माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी फईमला नागपुरातील एका हॉटेलमध्ये अटक केली तर अन्य एका आरोपीला चंद्रपुरातून अटक करण्यात आली. पोलीस चमूला १० हजारांचे बक्षीसया प्रकरणाचा तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलिसांच्या चमूला १० हजारांचे बक्षिस जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी जाहीर केले. हे प्रकरण तडीस नेण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनिल ताजने, सहाय्यल पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे, उपनिरीक्षक विवेक देशमुख, मेश्राम, सहाय्यक फौजदार शेख रहुफ, सुरेश केमेकर, अफसर खान, किशोर तुमराम, बळवंत शर्मा, प्रकाश बल्की, पाल, चौधरी, चालेकर, वाघमारे, दादुरवाडे, आतकुलवार, वैरागडे, चिकाटे, गिरडकर, शिंदे, बांबोळे यांनी परिश्रम घेतले.