शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

आज स्पष्ट होणार रिंगणातील चित्र

By admin | Updated: September 30, 2014 23:34 IST

जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील चित्र १ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपणार असल्याने निवडणुकीची खरी रंगतही आता चढणार आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील चित्र १ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपणार असल्याने निवडणुकीची खरी रंगतही आता चढणार आहे. सहाही विधानसभा मिळून १५३ उमेदवार रिंगणात आहेत. यात, राजुरा मतदारसंघात १९, चंद्रपुरात २१, बल्लारपुरात १८, ब्रह्मपुरीत २१, चिमूरमध्ये ४२ तर वरोरामध्ये ३२ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार चिमूर मतदार संघात असून त्या पाठोपाठ वरोराचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, या दोन्ही मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांनी कायम ठेवलेले अर्ज या पक्षाच्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. हे ओळखून नामांकन परत घेण्यासाठी संबंधितांवर पक्षनेत्यांकडून भर दिला जात असल्याची माहिती आहे. वरोरा मतदार संघात भाजपामध्ये असलेला तिढा अद्यापही सुटलेला नाही. येथे भाजपाकडून सात जणांचे नामांकन आहेत. भाजपाने संजय देवतळे यांना तिकीट दिल्यापासून उसळलेला क्षोभ अद्यापही शमलेला नाही. यामुळेच अखेरपर्यंत कुणीही नामांकन परत घेतले नसल्याची चर्चा आहे. तर, चिमूरमध्येही भाजपाकडून पाच जणांचे नामांकन आहेत. बंटी भांगडिया यांना भाजपाने तिकीट दिल्याने पक्षातील चार जणांनी आपले नामांकन रिंगणात ठेवले आहेत. या दोन्ही ठिकाणी सर्वांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात किती यश आले हे बुधवारी दुपारी ३ वाजतानंतर दिसणार आहे. या वेळच्या निवडणुकीत अपक्षांची डोकेदुखी सर्वच ठिकाणी वाढणार असे दिसत आहेत. या सोबतच अन्य पक्षांपेक्षा भाजपामध्ये दोन मतदार संघात बंडखोरांकडून डोके वर काढले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतसे मतदार संघातील राजकीय वातावरण तापत आहे. पक्षातील स्थानिक नेत्यांच्या जाहीर सभांनाही मतदारसंघांमध्ये सुरूवात झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)