शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

पदवीऐवजी कौशल्य विकासाकडे लक्ष द्या

By admin | Updated: October 15, 2015 01:14 IST

२१ वे शतक हे नुसते पदवी घेण्याचे नसून आपली योग्यता सिद्ध करण्याचे आहे. त्यामुळे तरुणांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे.

चंद्रशेखर बावनकुळे : सत्कार समारंभात युवकांना सल्लाचंद्रपूर : २१ वे शतक हे नुसते पदवी घेण्याचे नसून आपली योग्यता सिद्ध करण्याचे आहे. त्यामुळे तरुणांनी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे. पदवी घेण्याऐवजी कौशल्य विकासाकडे लक्ष द्यावे, असा सल्ला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपुरातील युवकांना दिला.तेली समाज आरक्षण संघर्ष समितीतर्फे जटपुरा गेट पंचतेली समाज भवन हनुमान मंदिर चंद्रपूर येथे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर तसेच तेली समाज आरक्षण समितीचे संयोजक योगेश समरीत, प्रकाश देवतळे, शोभाताई पोटदुखे, प्रकाश लोणकर, पांडुरंग आंबटकर, अ‍ॅड. मोगरे, सूर्यकांत खनके, राजेश रघाताटे आदी मंचावर होते. विदर्भातील मागास व ओबीसी समाजाला राज्याच्या मंत्रिमंडळात चांगली खाती मिळाल्याबद्दल या मेळाव्यात आनंद व्यक्त करण्यात आला. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संताजी जगनाडे महाराजाचे नाव देण्याची व तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने आरक्षणाची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.समारंभाचे संयोजक योगेश समरीत यांनी पाहुण्यांच्या स्वागतपर भाषणात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र प्रकल्पात शेतजमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याकडे लक्ष वेधले. प्रकल्पग्रस्तांना योग्य सुधारित दर, नोकऱ्या मिळाव्या अशा आशयाची मागणी त्यांनी बावनकुळे यांच्याकडे केली. कार्यक्रमाला शैलेश जुमडे, जितू इटनकर, छब्बु वैरागडे, मीनाक्षी गुजकर, कामडे, वैरागडे, शीतल इटनकर, अशोक सातपुते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अविनाश यांनी केले. यशस्वीतेसाठी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)