दहशत; पत्नीच्या समोर वाघाने शेतकऱ्याला ओढून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 07:01 PM2021-09-01T19:01:06+5:302021-09-01T19:02:24+5:30

Chandrapur News शेतात काम करीत असताना अचानक वाघाने झडप घेऊन एका शेतक?्याचा त्याच्या पत्नीच्या डोळ्यासमोर बळी घेतला. हतबल पत्नीने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत सारेच संपले होते.

Panic; The tiger dragged the farmer in front of his wife | दहशत; पत्नीच्या समोर वाघाने शेतकऱ्याला ओढून नेले

दहशत; पत्नीच्या समोर वाघाने शेतकऱ्याला ओढून नेले

Next
ठळक मुद्देतीन बिबटे जेरबंद केल्यानंतर आता वाघाची दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : शेतात काम करीत असताना अचानक वाघाने झडप घेऊन एका शेतकऱ्याचा त्याच्या पत्नीच्या डोळ्यासमोर बळी घेतला. हतबल पत्नीने आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत सारेच संपले होते. ही थरारक घटना बुधवारी सकाळी सावली वनपरिक्षेत्रांतर्गत पाथरी उपक्षेत्रातील गेवरा बीटमधील गेवरा खुर्द शिवारात घडली. शालिक चापले (४५) असे मृतकाचे नाव आहे. (Panic; The tiger dragged the farmer in front of his wife)

शालिक पत्नीसह स्वत:चे वैनगंगा नदी परिसरातील शेतात गवत कापायला गेले होते. परिसरात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घेतली. पत्नीने पतीला वाघाच्या तावडीतून सोडविण्यासाठी आरडाओरड करून शेजारच्या शेतकऱ्यांकडे मदतीची याचना केली. मात्र, तोपर्यंत वाघाने शालिक यांना फरपटत नेत ठार केले होते. वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

सावली वनपरिक्षेत्रात वाघांची संख्या वाढली

सावली वनपरिक्षेत्रात वाघांची संख्या वाढलेली आहे. मात्र, संख्येबाबत वन विभागच अनभिज्ञ आहे. वाघाचा मानवी वस्ती व शेतशिवारात वावर वाढला आहे. अलीकडेच सावली तालुक्यात वन विभागाने तीन बिबट्यांना जेरबंद केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असताना आता वाघाने दहशत निर्माण केली आहे

Web Title: Panic; The tiger dragged the farmer in front of his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ