सेवानिवृत्तीनंतर पांडुरंग बतकी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:20+5:302021-07-07T04:34:20+5:30

भद्रावती : लोकसेवा मंडळ, भद्रावतीद्वारा संचलित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग बतकी हे सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी लोकसेवा ...

Pandurang Bataki felicitated after retirement | सेवानिवृत्तीनंतर पांडुरंग बतकी यांचा सत्कार

सेवानिवृत्तीनंतर पांडुरंग बतकी यांचा सत्कार

भद्रावती : लोकसेवा मंडळ, भद्रावतीद्वारा संचलित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग बतकी हे सेवानिवृत्त झाले. याप्रसंगी लोकसेवा मंडळ भद्रावती, लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व लोकसेवा सहकारी कर्मचारी पतसंस्थेतर्फे त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला तसेच मागील महिन्यात सेवानिवृत्त झालेले उपप्राचार्य डॉ. सुरेश परसावार व शिक्षक भास्कर धकाते यांचाही सपत्निक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव मनोहर पारधे, शाळा समिती अध्यक्ष उल्हास भास्करवार, सहसचिव नामदेव कोल्हे, सदस्य गोपाल ठेंगणे, उमाकांत गुंडावार, अविनाश पामपट्टीवार, आशिष गुंडावार, अर्चना परसावार, आशा बतकी, प्रतिभा धकाते, उपप्राचार्य बंडू दरेकर, पर्यवेक्षक आशालता सोनटक्के, सचिन सरपटवार व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी सेवानिवृत्तधारकांनी आपले मनोगत व्यक्त केले. लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Pandurang Bataki felicitated after retirement