येथे १ कोटी ९९ लक्ष रुपये किंमतीची नवी राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली असली तरी, चार वर्ष लोटूनसुद्धा जुन्या ५ कोटी ८० लक्ष रुपये किंमतीच्या योजनेचा लेखा परीक्षण अहवाल अजूनही अपूर्ण आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणीत रखडलेल्या, नव्या पूरक पाणीपुरवठा योजन ...
कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रातील पेसा अंतर्गत येणाऱ्या सात गावांतील तेंदू संकलन केंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने तेंदूपत्ता संकलन केंद्र सुरु करणाºया समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
वाहनाने गस्त घालत असताना ट्रकच्या धडकेत येथील ठाणेदार प्रमोद मकेश्वर यांच्यासह तीन पोलीस जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर घडली. विठोबा गजभिये, पुंडलिक परचाके, नाजूक चहांदे अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. ...
एसटीतून प्रवास करणारे सवलतधारक व सामान्य प्रवाशांना आता कागदी पास न देता राज्य परिवहन महामंडळाकडून विशिष्ट चिप बसवलेले, बँक व आधारकार्डशी लिंक असलेले अत्याधुनिक स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. या लोकोपयोगी मोहिमेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी मागील ...
चंद्रपूर शहर सध्या होरपळून निघत आहे. मागील पाच दिवसांपासून सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. जणू संपूर्ण चंद्रपूर शहरालाच आग लावण्याचा विडा सूर्याने उचलला की काय, असा भास होत आहे. यामुळे जनजीवन प्रभावित झाले. ...
राजुरा येथील शिवाजी स्टेडियम येथे सोमवारी सकाळी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला. त्याची हत्या करण्यात आल्याचे परिस्थितीवरून पोलिसांनी ओळखले आणि अवघ्या दोन तासातच आरोपीला अटक केली. ...
येथील विवेकानंद वॉर्डात एका गोडावूनजवळ बल्लारपूर पोलिसांनी २८ लाख रूपये किंमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी करण्यात आली. या कारवाईत चारचाकी वाहनही ताब्यात घेण्यात आले. ...
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी विहिरीतील गाळ काढण्यावर भर दिला आहे. गाळ काढण्यासाठी ३० प्रस्ताव या पंचायत समितीला प्राप्त झाले आहेत. तर आठ ग्रामपंचायतींनी नळयोजनेच्या विशेष दुरूस्तीची मागणी केली आहे. ...
मागील पाच वर्षांपासून जिल्ह्यात कपासीचे लागवड क्षेत्र वाढले. मात्र, यंदा हंगामपूर्व लागवड केल्यास गुलाबी बोंड अळीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी. ...
इंग्रजी माध्यमातील शिक्षण देण्यासाठी पायाभूत सुविधा नसतानाही ग्रामीण भागात कॉन्व्हेंटची संख्या वाढू लागली. पालकांच्या दृष्टीने एक सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले. पण दुसरीकडे काही संस्थानी आवश्यकता नाही अशा गावांमध्येही कॉन्व्हेंट सुरू केल् ...