नुकतेच रेती घाटाचे लिलाव करण्यात आले. त्यानंतर कंत्राटदारांमार्फत रेतीचा उपसा करून वाहतूक करणे सुरू झाले. याला एक महिना होत नाही तोच, रेतीचा उपसा बंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ...
राजुरा येथील एका वसतिगृहातील विद्यार्थिंनीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मूलनिवासी गोंडीयन आदिवासी समाज व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. ...
शासनस्तरावर ३३ कोटी वृक्ष लागवड नियोजनाचा आराखडा तयार झाला आहे. ग्रामपंचायतस्तरावर यासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन हजार ४०० रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले. परिणामी, जिल्हा परिषद प्रशासनाने दोन वर्षे नऊ महिने कालावधी दरम्यान ४५ लाखांच्य ...
पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर, सितागुडा व लचमागुडयातील जलस्रोत पुर्णपणे कोरडे पडल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने खोदलेल्या विहिरीसुध्दा कोरड्या पडल्या आहे. असे असतानाही नाईलाजने या आटलेल्या विहिरीत गाळयुक्त पाणी काढून ते प्यावे ...
भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. ही घटना गांगलवाडीजवळील विकासनगरजवळ गुरुवारी सकाळी घडली. रोहिणी घनश्याम लुटे (४५) रा. कोसंबी (गवळी) ता. नागभीड असे मृतक महिलेचे नाव असून त्या आशा वर्कर म्हणून कार्यरत होत्या ...
पावसाळ्यापूर्वी करायची कामे महापालिकेने हातात घेतली आहे. शहरातील कृत्रिम पूरपरिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी या मोठ्या नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. ...
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर दिला आहे. यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध योजनांतर्गत जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जात आहे. पण काही भागातील ग्रामीण जनता यापासून अनभिज्ञ आहे. ...
नवी दिल्ली येथील नवव्या साऊथ एशियन कराटे स्पर्धेत जिल्ह्यातील २१ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून २७ पदके जिंकली. ही पदके गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ...
राजुरा येथील इन्फंट जिजस सोसायटीव्दारे संचालित वसतिगृहात आदिवासी विद्यार्थिंनीवर अत्याचार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू असून, सीबीआय चौकशीची मागणी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी क ...
तालुक्यात सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रात कमालीची वाढ झाली. यंदा सुमारे १७७.९ हेक्टर क्षेत्रात भात रोवणी झाली असून भाजीपाला, फुलझाडे, टरबूज व इतर पिकेही शेतकरी घेताना दिसत आहेत. ...