एशियन स्पर्धेतील पदके शहीद जवानांना समर्पित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:30 AM2019-05-09T11:30:28+5:302019-05-09T11:30:59+5:30

नवी दिल्ली येथील नवव्या साऊथ एशियन कराटे स्पर्धेत जिल्ह्यातील २१ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून २७ पदके जिंकली. ही पदके गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित केल्याची माहिती  पत्रकार परिषदेत दिली.

Asian Games medal dedicated to martyr jawans | एशियन स्पर्धेतील पदके शहीद जवानांना समर्पित

एशियन स्पर्धेतील पदके शहीद जवानांना समर्पित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नवी दिल्ली येथील नवव्या साऊथ एशियन कराटे स्पर्धेत जिल्ह्यातील २१ खेळाडूंनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून २७ पदके जिंकली. ही पदके गडचिरोली येथे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित केल्याची माहिती  चंद्रपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्ह्यातील २१ खेळाडूनी तब्बल २७ पदके जिंकली.खेळांडूनमध्ये मनमीत हरडे, श्रद्धा गुप्ता, गायत्री झाडे, शहाबाज गजनफरशेख, मनजीत अजितमंडल, मोहम्मद मुहाफीज सिद्दीकी, पोर्णिमा भगत, आदित्य गेडाम, अस्मिता बाम्हणकर, हितेन बेहरे, साक्षी गुरनुले, श्रावनी हेडाऊ, तन्वी हेडाऊ, तुराब सिद्दीकी, अक्षता लांबाडे, तुलाक्षी पाटील, सर्वेश शेंडे, आयुश शेंडे, आर्यन धोटे, सोपान पिंपळे, वैभव कुबडे यांचा समावेश आहे. रविंद्र मुक्के, कपिल मसराम, मोनिश हिकरे, हेमा घारपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विनय बोढे, फे्रेन्डस चॅरिटी क्लबच्या सरीता मालू, रंजना नागतोडे, डी.एस. ख्वाजा, महेश काहीलकर उपस्थित होते.

Web Title: Asian Games medal dedicated to martyr jawans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.