तालुक्यातील कोडशी घाटावर हजारो ब्रास रेतीचे अवैध खनन सुरू असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. जेसीबी व पोकलेनचा वापर करून हायवाच्या माध्यमातून रेती माफिया साठा करत आहेत. या गंभीर बाबीची माहिती महसूल विभागाला असूनही दुर्लक्ष केल्या जात आहे, असा आर ...
मागील काही दिवसांपासून चातकासारखी वाट बघूनही पाऊस हुलकावनी देत असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यामुळे काही प्रमाणात का होईना उकाळ्यापासून दिलासा मिळाला. ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून दरवर्षी फळांच्या रोपांची दरवर्षी वाढत असल्याने मालडोंगरी येथील बीज गुणन प्रक्षेत्राचे फळरोपवाटिकेत विस्तारीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याकरिता ९५ लाखांचा निधी मंजूर केला असून लवकरच पायाभूत कामां ...
जंगलाला लागलेली आग विझविण्याचे मुख्य काम फायरवॉचर करतो. मात्र त्या हंगामी स्वरुपात काम देण्यात येते. परिणामी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना समोर जावे लागते. त्यामुळे फायरवॉचरला बारमाही काम देण्यात यावे, अशी मागणी फायरवॉचरच्या मेळाव्यात एकमुखाने करण्यात ...
तीन वर्षांपूर्वी तळोधी (बा.) पोलीस स्टेशनची स्थापना झाली. पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी जागाही निश्चित करण्यात आली. मात्र अद्यापही बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे आजही येथील कारभार किरायाच्या जीर्ण इमारतीमधून चालत आहे. ...
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. काही ठिकाणी धुळपेरणीही झाली आहे. तर काही ठिकाणी हंगामपूर्व मशागतीची कामे अंतीम टप्प्यात आहे. शेती उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी बहुतांश शेतकरी शेतात शेणखत टाकतात. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेणखताच्या दरात मोठी वाढ ...
काही वर्षांपासून सालगड्यांच्या मजुरीमध्ये मोठी वाढ झाल्याने तसेच शेती कसण्यासाठी विश्वासू सालगडी मिळत नसल्याने आता शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळले आहे. परिआमी शेतमजुरांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. ...
यावर्षी तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. जून महिना अर्धा संपला तरीही तापमानात फरक पडला नाही. शेतीच्या खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना काही प्रमाणात सुरुवात झाली. ...
रविवारपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने शहरात खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. विनोद रामदास बानकर रा. नेहरू वार्ड असे मृताचे आहे. ...
जिल्हा परिषद शाळांची नवीन सत्रातील पहिली घंटा येत्या २६ जूनला वाजणार आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रवेशाची जय्यत तयारी केली. यंदा प्रथमच संवर्ग-१ चे तब्बल ३६ अधिकारी जिल्ह्यातील ३६ शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणार ...