अन्यथा ब्रह्मपुरीच्या प्रत्येक चौकात भरवू शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:31 IST2021-09-22T04:31:58+5:302021-09-22T04:31:58+5:30

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी बीआरएसपी शाखा ब्रह्मपुरीच्यावतीने तहसीलदार मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन ...

Otherwise fill schools in every chowk of Brahmapuri | अन्यथा ब्रह्मपुरीच्या प्रत्येक चौकात भरवू शाळा

अन्यथा ब्रह्मपुरीच्या प्रत्येक चौकात भरवू शाळा

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू करण्यात यावे, यासाठी बीआरएसपी शाखा ब्रह्मपुरीच्यावतीने तहसीलदार मार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाची परिस्थिती आहे हे आम्हाला मान्य आहे. तरीपण शिक्षण सोडता सर्व जनजीवन सुरळीत सुरू आहे. राज्यातील सर्व सभा, कार्यक्रम, संमेलन, बाजार, बससेवा, रेल्वे, दारू दुकाने व इतर सर्व सेवा सुरु आहेत. त्याचप्रमाणे सर्व शाळा व महाविद्यालये सुरू करावे. जर शाळा असेच बंद राहिल्या तर येणारी पिढी,समाज व देशाचेच भवितव्य धोक्यात येईल. कारण आजचे विद्यार्थी उद्याचे भवितव्य आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळा व कॉलेज सुरू करण्यात यावे अन्यथा बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा एक आठवड्यानंतर ब्रह्मपुरीच्या प्रत्येक चौकात शाळा लावून मुलांना शिकवण्याचे काम करेल आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन - प्रशासनची असेल असा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना रोशन मेंढे, प्रगती शेंडे, संगम मेश्राम, निखील रामटेके, अंकित घोडेस्वार, धम्मदीप रामटेके, पल्लवी मेश्राम, राजेश्वरी लोखंडे, अमर रामटेके, नितीन फुलझेले, ममता मेश्राम, अविनाश तुपटे, चेतना कौरवते, सिमरन नगराळे, प्रेमानंद कुथे उपस्थित होते.

210921\img-20210921-wa0070.jpg

नायब तहसीलदार यांना निवेदन सादर करताना बीआरएसपी चे कार्यकर्ते

Web Title: Otherwise fill schools in every chowk of Brahmapuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.