शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण शिक्षण शिबिराचे आयोजन

By admin | Updated: October 16, 2015 01:37 IST

ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी व तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही, तळोधी, नागभीड, उत्तर व दक्षिण ब्रह्मपुरी व चिमूर...

अनुकरणीय उपक्रम : विविध विषयांवर मार्गदर्शनशंकरपूर : ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी व तरुण पर्यावरणवादी मंडळ शंकरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सिंदेवाही, तळोधी, नागभीड, उत्तर व दक्षिण ब्रह्मपुरी व चिमूर येथे एक दिवसीय पर्यावरण शिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सिंदेवाही वनविभागांतर्गत सिंदबोडी, येथील पर्यावरण शिक्षण शिबिराचे उद्घाटन सहाय्यक वनसंरक्षक मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये वनस्पतीची ओळख व महत्त्व या विषयावर सुर्यकांत खोब्रागडे, वन्यप्राणी यांची विष्ठा, पाऊलखुणा या विषयावर अमोद गौरकर, पर्यावरण काळाची गरज या विषयावर अवार्ड संस्थेचे गुणवंत वैद्य, साप-श्रद्धा व अंधश्रद्धा, यावर मूल येथील सर्पमित्र उमेशसिंह झिरे, वनपरिक्षेत्राधिकारी कामडे यांनी मार्गदर्शन केले. तळोधी वनविभागाअंतर्गत पेरजागड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले तर नागभीड वनविभागाअंतर्गत घोडाझरी, ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत एकारा (भुज) चिमूर वनविभागाअंतर्गत मुक्ताई येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थ्यांना वनस्पतीची ओळख व महत्त्व, वण्यप्राणी पाऊलखुणा व विष्ठा, पर्यावरणाचा समतोल राखणे, मानव व वन्यजीव संघर्ष, साप श्रद्धा व अंधश्रद्धा या विषयावर येथील सुर्यभान खोब्रागडे, अवार्ड संस्थेचे गुणवंत व तरुण पर्यावरणवादी मंडळाचे अमोद गौरकर, विरेंद्र हिंगे, झेप निसर्ग संस्थेचे पवन नागरे, अमित देशमुख, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सहायक वनसंरक्षक मेश्राम, पंधरे, वनपरिक्षेत्राधिकारी आक्केवार, कामडी, पठाण, विजय गजभे आदींनी मार्गदशन केले. (वार्ताहर)